शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित निधीची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:34 IST

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने सर्व विभागांच्या अखर्चित निधीची जुळवाजुळव सुरू केली आहे. प्रत्येक विभागाकडून जमा-खर्चाचा हिशेब मागण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सर्व विभागांकडून माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने सर्व विभागांच्या अखर्चित निधीची जुळवाजुळव सुरू केली आहे. प्रत्येक विभागाकडून जमा-खर्चाचा हिशेब मागण्यात आला आहे.शासनाकडून दरवर्षी विविध विभागांना निधी दिला जातो. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करणे आवश्यक असते. मात्र जिल्हा परिषदेतील लेटलतीफीमुळे हा निधी बरेचदा पडून राहातो. महिनोगणती त्याला हातच लावला जात नाही. मात्र मार्च महिना जवळ येताच सर्वच विभागांना निधीची आठवण होते. हा निधी खर्ची घालण्यासाठी विभाग आणि त्यांच्या प्रमुखांची धावपळ सुरू होते. प्रत्यक्षात केवळ तीन महिन्यात निधी खर्ची घालणे अवघड होते. यातून वाचण्यासाठी अधिकारी विविध फंडे वापरून आपल्यावर निधी वापरला नाही म्हणून बालंट येऊ, याची दक्षता घेण्यासाठी धावपळ करतात.वित्त विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांना आता निधीचा लेखाजोखा मागितला आहे. कोणता निधी मिळाला, किती निधी मिळाला, त्यातून कोणत्या योजनांवर किती खर्च झाला, सध्या किती निधी शिल्लक आहे, याचा लेखाजोखाच वित्त विभागाने मागितला आहे. त्यामुळे सर्व विभागात निधीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काही विभागांची आकडेमोड ताळमेळ खात नाही. त्यामुळे निधीच्या आकड्यांचा ताळमेळ जुळविण्यात संबंधित विभागातील लेखापालांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकदाची जुळवाजुळव झाली की, वित्त विभागाला सर्व विभाग निधीचा लेखाजोखा सादर करणार आहे.निधी जाणार परतविविध विभागांकडे अखर्चित असलेल्या निधीपैकी काही निधी शासन जमा होणार आहे. राज्य शासनाने वित्त विभागाला पत्र देऊन अखर्चित निधीचा हिशेब मागितला आहे. वित्त विभागाकडे हिशेब सादर होताच, त्यापैकी काही निधी त्वरेने शासन परत घेणार आहे. केवळ अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे हा निधी आता शासन जमा होण्याची शक्यता आहे. तो आत्तापर्यंत संबंधित कामांवर खर्ची घातला असता, तर निधी परत जाण्याची वेळ ओढवली नसती, एवढे निश्चित.