लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : विहिरीत पोहायला गेले म्हणून जळगाव जिल्ह्यात मातंग समाजाच्या मुलांना नग्न करुन बेदम मारहाण झाली. या घटनेचा निषेध नोंदवित मातंग समाजाने तहसीलवर धडक दिली.संपूर्ण महाराष्ट्रात मातंग समाज हा शांत व तितकाच कायद्याचा सन्मान करणारा समाज म्हणून ओळखला जातो. कोणत्याही गुन्ह्यात किंवा अप्रिय घटनेशी या समाजाचा काडीचाही संबंध नसतो. मात्र तरीही राज्यात सर्वत्र मातंग समाजावर दिवसेंदिवस अन्याय, अत्याचार वाढत आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील मातंग समाज बांधवांनी मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी जळगाव जिलह्यातील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वाकडी येथे मातंग समाजाच्या मुलांना नग्न करुन बेदम मारहाण करण्यात आली. लातूर जिल्ह्यात समाजाच्या नवरदेवाला मारोतीच्या मंदिरात का गेला म्हणून मारहाण झाली. अशा घटना वारंवार घडत आह. मात्र आता अन्याय सहन न करता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाजाने दिला आहे.याबाबत तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना अश्विन इंगळे, अभय इंगळे, आनंदा गायकवाड, प्रमोद आमटे, राजू इंगळे, दिगांबर उबाळे, गजानन इंगोले, सुरेश तायडे, संजय भालेराव, किशोर कांबळे, लखन सरकटे, गोपाल तायडे, बाबाराव गरडे, संतोष तायडे, कैलास इंगोले, भगवान धनेकर आणि समाज बांधव उपस्थित होते.
मातंग समाजाची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:23 IST
विहिरीत पोहायला गेले म्हणून जळगाव जिल्ह्यात मातंग समाजाच्या मुलांना नग्न करुन बेदम मारहाण झाली. या घटनेचा निषेध नोंदवित मातंग समाजाने तहसीलवर धडक दिली.
मातंग समाजाची तहसीलवर धडक
ठळक मुद्देदिग्रसमध्ये मोर्चा : जळगाव येथील मुलांच्या मारहाणीचा निषेध