यवतमाळ : महाराष्ट्र मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनशी संलग्न यवतमाळ जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्सच्या ३५ ते १०० वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या स्पर्धा नेहरू स्टेडियमवर पार पडल्या. यात निवड झालेले मास्टर अॅथलिट्स राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत नामदेवराव बानोरे, साहेबराव निकम, गुरुविंदरसिंग फ्लोरा, विनोद नायडू, विजय जोशी, नरेंद्र भांडारकर, प्रवीण कापर्तीवार, सुधांशू काळे, विनोद आत्राम, शरद घारोड, मंगेश खुने, देवानंद तांडेकर, विजय वाघ, डॉ. प्रदीपकुमार गिरी, संदीप शिवरामवार, गजानन ठाकरे, अशोक शिरे, संतोष भगत, सचिन माळोदे, निर्मलकुमार पवार, नंदकुमार सरोदे, संजय उईके, गणेश सोनार, भावना भेलोंडे, मनोहर पाटील, संदीप खांदवे, प्रतिभा डबले, राहुल ढोणे, संजय काळे, लता माटे, महेंद्र शिरभाते, प्रणिता कावळे, अशोक हजारे, डॉ. पी.बी. जोंधळे, सचिन सानप, वनिता झुरळे, पंकज पाचपवार, अनिल निर्मल, अब्दुल जावेद, अल्का लोणकर, शालीनी लोणकर, राजेश चव्हाण, श्रीराम चव्हाण, संजय पिसाळकर, नरेंद्र थोरात, योगेश बोपचे, महेश सोनेकर, गजानन गाडगे, चंद्रशेखर कडू, पांडुरंग भोयर, विनायक ठाकरे, सुनीता रोहणकर, मीना सांगळे, घनश्याम अहीर, मोहन हेमणे, रेखा पोयाम, राजू कुटे, उमाकांत जांबलीवार, संजय नलगुंडवार, शभांगी सारडे, मंजूषा बोरगमवार, जितेंद्र ब्राह्मणकर, अजय अक्कलवार यांची विविध वयोगटात निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये व संतोष विघ्ने यांचे सहकार्य लाभले. पंच म्हणून पंकज शेलोडकर, अभिजित पवार, प्रीतम शहाडे, अण्णा पालेकर यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
मास्टर्स अॅथलिट्सची राज्यस्तरावर धडक
By admin | Updated: September 26, 2016 02:38 IST