अशोक काकडे - पुसदसागवान तस्करीत योगायोगाने सापडणारे आरोपी खरे चोरटेच नसतात. ते गरीब मजूर आणि लाकूडतोड करणारेच असात. आजपर्यंत झालेल्या कारवाईत हेच उघड झाले असून खरे मास्टरमार्इंड मोकळेच दिसतात. हिमायतनगरजवळील कारवाईसुद्धा अशीच काहीशी आहे. अहेमद नावाचा मास्टरमार्इंड पसार झाला असून साधे मजूर वन विभागाच्या जाळ्यात अडकले. मुख्यालयी राहून जंगलाचे रक्षण करणारे तस्करांना जेरबंद तरी करणार कसे, असा प्रश्न आहे.वन अधिकाऱ्यांच्या तावडीत कुणीही येवो, मग तो छोटा गुन्हा करणारा साधा मजूर का असेना, त्याची खैर नाही. त्याला एकदा ताब्यात घेतले, की मागच्या फाईली उघडल्या जातात. कुठल्या तरी प्रकरणी अवैध कटाई झालेल्या सागवान थुटांजवळ त्याला नेऊन फोटो काढले जातात आणि त्याला अडकवून कारवाई पूर्ण केली जाते. साधारणत: अशिक्षित असलेला आरोपी मजूर दबावाखाली तपासाच्या कागदांवर सह्या देतो आणि तपास पूर्ण केला जातो. संबंधित प्रकरणाची फाईल बंद केली जाते. हिमायतनगरजवळील प्रकरणात असेच काहीसे झाले आहे, सागवान तस्करीतील मास्टरमार्इंडला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न झालेले दिसत नाहीत. हिमायतनगर जवळ पकडलेल्या टोळीमधील म्होरक्या अहेमद पसार होण्यात यशस्वी झाला. मास्टरमार्इंडचा शोध लावण्यापेक्षा सापडलेल्या मजुरांवर कारवाई करण्यातच अधिकाऱ्यांनी समाधान मानले. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार पुढे आला. सागवान तस्करी करणारे तेलंगाणातील केशवपट्टणम येथील रहिवाशी आहेत. अहेमद नावाच्या म्होरक्या मजुरांना अधिक पैशाचे अमीष देतो. सण समारंभ चांगले साजरे होईल या आशेने ते यात सहभागी होतात. केवळ दोन तासाचे काम असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर या मजुरांना वाहनाने मराठवाडा-विदर्भाच्या सीमेपर्यंत आणले जाते. सागवान तोड करून त्याची तस्करी करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे मास्टरमार्इंड मोकळेच राहतात आणि मजूर हाती लागतात.कुठेतरी जंगलात वाहन फसले तरच चोऱ्या उघडकीस येतात. पुसद वन विभागांतर्गत आजपर्यंत उघडकीस आलेल्या चोरीप्रकरणी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. प्रकरणाची तीव्रता कमी करण्यासाठी खालच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई दाखविली जाते.
सागवान तस्करीतील मास्टरमार्इंड मोकळेच
By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST