शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

फुलसावंगी दरोड्याचा ‘मास्टर मार्इंड’ बाबर पोलिसांना शरण

By admin | Updated: February 2, 2016 02:07 IST

येथील कापूस व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या २७ लाखांच्या धाडसी दरोड्याचा मुख्य सूत्रधार बाबर खान शहादत खान (३०) याने सोमवारी सकाळी ६ वाजता महागाव पोलिसांपुढे शरणागती पत्करली.

२३ लाखांच्या जप्तीचे आव्हान : आतापर्यंत चार आरोपी ताब्यातमहागाव : येथील कापूस व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या २७ लाखांच्या धाडसी दरोड्याचा मुख्य सूत्रधार बाबर खान शहादत खान (३०) याने सोमवारी सकाळी ६ वाजता महागाव पोलिसांपुढे शरणागती पत्करली. तो नांदेड, दिल्ली, राजस्थान मार्गे महागावात पोहोचल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या चोरीतील मुद्देमाल आणि इतर आरोपींना पकडणे पोलिसांना शक्य होणार आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून ३ लाख ७७ हजार रुपये रोखही जप्त केली आहे. यातील आणखी २३ लाखांच्या रोकड जप्तीचे आव्हान पोलिसांपुढे आहे.फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी धाडसी दरोडा पडला होता. चोरट्यांनी २७ लाख रोख आणि दोन तोळे ऐवज लंपास केला होता. या दरोड्यातील आरोपी शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. दरम्यान, ‘लोकमत’ने यात बाबर टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र सुरुवातीला आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, महागाव पोलिसांनी मुंबई येथून अयाजोद्दिन ऊर्फ लखू आयसोद्दिन नवाब (२०) याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून अशफाक खान शहादत खान याला ताब्यात घेवून त्याच्या शेतातून तीन लाख ७७ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. मात्र या टोळीचा सूत्रधार बाबर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. आरोपीच्या अटकेसाठी फुलसावंगी येथून व्यापाऱ्यांचा दबावही वाढत होता. तर पोलिसांनी बाबरच्या नातेवाईकाला पोलीस ठाण्यात चौकशीकरिता बोलावून घेतले होते. याची माहिती बाबरला मिळताच तो महागाव ठाण्यात पोहोचला. फुलसावंगी येथून नांदेड, पुणे, हैदराबाद, दिल्ली, राजस्थान यासह गोव्यातही जावून आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. बाबर हा हिस्ट्रीसिटर असून महागाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे या धाडसी चोरीतील तपास सुकर झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रकाश शेळके, दुय्यम ठाणेदार एस.डी. गोसावी तपास करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)