शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मध्ये मास्कचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 21:10 IST

कोरोना विषाणू संसर्गातून फैलाव होतो. याचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरावा असे सर्रासपणे सांगितले जात आहे. यातही दोन मतप्रवाह आहे. अनेक तज्ज्ञ सामान्य व्यक्तींनी मास्क वापरु नये असे सांगतात केवळ ठराविक अंतर ठेऊन संभाषण करावे तर रुग्णांच्या संपर्कात येणाºया व्यक्तीने कोरोना कीटचा वापर करावा, सतत गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्यांनी मास्क वापरावा असे सांगितले जाते.

ठळक मुद्देआंतरवासिता डॉक्टर असुरक्षित । ओपीडी, आयसोलेशन वार्ड व अपघात कक्षातच पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारपर्यंत कोरोना बाधित तीन रुग्ण उपचार घेत होते. मेडिकल प्रशासनाकडे गरजेपुरते मास्क उपलब्ध असल्याने इतर वार्डामध्ये काम करणाऱ्या आंतरवासिता डॉक्टरांना मास्क पुरविले जात नाही. रुग्णालयाबाहेर फिरणाऱ्यांसाठीसुद्धा मास्क उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसर्गातून फैलाव होतो. याचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरावा असे सर्रासपणे सांगितले जात आहे. यातही दोन मतप्रवाह आहे. अनेक तज्ज्ञ सामान्य व्यक्तींनी मास्क वापरु नये असे सांगतात केवळ ठराविक अंतर ठेऊन संभाषण करावे तर रुग्णांच्या संपर्कात येणाºया व्यक्तीने कोरोना कीटचा वापर करावा, सतत गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्यांनी मास्क वापरावा असे सांगितले जाते. शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांच्या वार्डमध्ये काम करणाºया डॉक्टर व नर्सला कोरोना कीट पुरविण्यात आली आहे. यामध्ये कॅप, मास्क, गॉगल, पूर्ण अ‍ॅप्रन, ग्लोज याचा समावेश आहे. ही कीट फक्त रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनाच दिली जाते. या व्यतिरिक्त मेडिकलमधील बाह्य रुग्ण तपासणी विभाग, अपघात कक्ष येथील डॉक्टर व इतर स्टाफला मास्क देण्यात आले आहे. उर्वरित वार्ड व इतर ठिकाणी काम करणाऱ्यांना मास्कची गरज नसल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही आंतरवासिता विद्यार्थी स्वत:ला असुरक्षित समजत असून त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे मास्कची मागणी केली आहे. सध्या एक हजार थ्रीलेअर साधे मास्क रुग्णालयात आले आहे तर १५०० मास्क मुंबईवरून निघाले असून दोन दिवसात मेडिकलमध्ये येतील असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मेडिकलमध्ये गरजेपुरते मास्क उपलब्ध आहे. अवांतर व्यक्तींसाठी मास्क पुरविणे सध्या शक्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.गर्दी ओसरलीकोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह््यात उद्रेक झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. पूर्वी किमान दोन हजार रुग्ण बाह्य तपासणी विभागात येत होते. आता हा आकडा ७०० च्या घरात पोहोचला आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयcorona virusकोरोना वायरस बातम्या