शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहीद पोलीस आग्रमन रहाटे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:14 IST

शहीद आग्रमन अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहीद आग्रमन बक्षी रहाटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या आग्रमन यांच्या अंत्ययात्रेने तरोडा गावापासून मंगरुळ गावापर्यंतचा रस्ता गर्दीने व्यापून गेला होता.

ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार : तरोडा येथे जनसागर लोटला, मंत्री, आमदार, प्रशासनाची उपस्थिती

आसीफ शेख।लोकमत न्यूज नेटवर्कजवळा (आर्णी) : शहीद आग्रमन अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहीद आग्रमन बक्षी रहाटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या आग्रमन यांच्या अंत्ययात्रेने तरोडा गावापासून मंगरुळ गावापर्यंतचा रस्ता गर्दीने व्यापून गेला होता.गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. त्यात तरोडा (ता. आर्णी) येथील आग्रमन बक्षी रहाटे यांनाही वीरमरण आले. गुरुवारी रात्री १२ वाजता त्यांचे पार्थिव तरोडा येथे आणण्यात आले. तत्पूर्वीच गावातील तसेच पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी तरोडा येथे गर्दी केली होती. तसेच आर्णीचे पोलीस प्रशासनही उपस्थित होते. तर शुक्रवारी सकाळी ८ वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. तरोडा येथील प्राथमिक शाळेपासून सुरू झालेली ही अंत्ययात्रा नागपूर-तुळजापूर महामार्गावरून मंगरुळ येथे गेली. तेथून पुन्हा तरोडा गावात अंत्ययात्रा पोहोचली. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी शहीद आग्रमन अमर रहे, शहीद आग्रमन जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.आग्रमन यांची आई निर्मलाबाई, पत्नी रेश्मा, गार्गी व आरुषी या दोन मुली, सुकेशना व रिना या बहिणी तसेच भाऊ आशिष यासर्वांचे दु:ख पाहून उपस्थित जनसागरही हेलावून गेला. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी गावकऱ्यांनी, चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारासाठी तरोडा ग्रामवासीयांनी प्राथमिक शाळेच्या पटांगणात शहीद स्मारक तयार केले. त्या स्मारकामध्ये भाऊ आशिष रहाटे यांनी शहीद आग्रमन यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार संदीप धुर्वे, विजय मोघे, जितेंद्र मोघे, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, आर्णीचे तहसीलदार श्रीकांत निळे, ठाणेदार यशवंत बावीस्कर, सरपंच भेडेकर, पंचायत समितीचे माजी सभापती राजू वीरखेडे, गुरुदेव सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गणेशराव मोरे यासह हजारो नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.शहीद आग्रमन अमर रहे !संपूर्ण जिल्ह्यातून हजारो नागरिक शहीद आग्रमन रहाटे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. लांबच लांब निघालेल्या अंत्ययात्रेत नागरिकांनी शहीद आग्रमन अमर रहे, शहीद आग्रमन जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली