शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शहीद स्मारक अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:55 IST

येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.

ठळक मुद्देराजकीय पक्षांचे दुर्लक्ष : कळंब नगर पंचायतीला बांधकामाचा मुहूर्तच मिळेना

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज काळे यांनी हा विषय विरोधी पक्षात असताना अनेकदा जोरदारपणे लाऊन धरला होता. उपोषणाचेही हत्यार त्यांनी उपसले होते. त्यामुळेच ग्रामपंचायत अस्तित्वात असताना मागासक्षेत्र अनुदान निधीतून स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात आली़ परंतु मागील दहा वर्षांपासून स्मारक बांधकामाला मुहूर्तच सापडलेला नाही़दुसरीकडे स्मारक समिती नेमणाºयांनी समितीत असण्यातच धन्यता मानली. त्यापुढे त्यांचे पाऊल सरकलेच नाही. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. महत्वाचे म्हणजे ज्यांनी हा विषय सातत्याने उपस्थित केला तेच मनोज काळे आता उपनगराध्यक्ष आहे. त्यांनी सत्ता आली तेव्हापासून शहीद स्मारकाचा विषय बाजूला ठेवला. विरोधी पक्षात असताना शहीद स्मारकासाठी रान उठविणारेच आता सत्तेत असूनही तोंड उघडायला तयार नाही, ही शोकांतिका आहे.देश पारतंत्र्यात असताना तालुक्यातील वीरांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन इंग्रज राजवटीच्या विरोधात लढ्यात उडी घेतली़ यामध्ये रामभाऊ महादेव माळी़, वासूदेव दाजीबा आष्टीकर, महादेव शिवराम माळी व चंपत मराठा या चौघांना वीरमरण आले़ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील इंदिरा गांधी चौकात १९७३ साली शहीद स्मारक उभारण्यात आले़ परंतु काळाच्या ओघात याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले़ वास्तविक शहीद स्मारकांचे सौंदर्यीकरण व स्मृती जपण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे़ मागील ५० वर्षात मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी स्मारकांच्या सौंदर्यीकरणासाठी अनेकदा आश्वासन दिले़ परंतु शब्द पाळला नाही, ही वास्तविकता आहे.