शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी मुला-मुलींचा विवाह मेळावा

By admin | Updated: December 16, 2015 02:46 IST

आर्थिक तंगीपायी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची प्रेरणा देण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियान सुरू केले आहे.

सीईओंचा पुढाकार : बळीराजा चेतना अभियानाचे पुढचे पाऊल, २८ फेब्रुवारीला होणार सोहळायवतमाळ : आर्थिक तंगीपायी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची प्रेरणा देण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलामुलींचा विवाह मेळावा घेण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. हा विवाह मेळावा येत्या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी होणार आहे. त्यातून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. बळीराजा चेतना अभियानात गावोगावी भजन, कीर्तन, पथनाट्य असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. स्थानिक कलावंत आणि प्रबोधनकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रबोधनासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा तातडीने देण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सामूहिक विवाह मेळाव्याची संकल्पना मांडली. त्याला जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाकडून दुजोरा मिळाला. २८ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा विवाह मेळावा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी कुटुंबीयांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून संबंधित गावातील शेतकरी कुटुंबातील उपवर मुलेमुली, आर्थिक तंगीत असलेली शेतकरी कुुटुंबे यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हाभरातील माहिती गोळा झाल्यानंतर या मेळाव्याचे अंतिम नियोजन केले जाणार आहे. शिवाय इच्छूक शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना स्वत:हूनही या मेळाव्यासाठी आपली नाव नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. मेळाव्यातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास विवाह मेळाव्यापूर्वी परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या कामासाठी शासनाचे विविध विभाग, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आदींचीही मदत घेतली जाणार आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे प्रामुख्याने मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या खर्चाचा मोठा प्रश्न असतो. या दोन खर्चांची पूर्ती करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आपली नाचक्की झाल्याची भावना निर्माण होते. त्यातूनच खचलेला शेतकरी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रशासनाने बळीराजा चेतना अभियानात पुढचे पाऊल टाकत सामूहिक विवाह मेळाव्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)मुलीच्या सासरी शौचालयाची भेटशेतकरी मुलामुलींच्या सामूहिक विवाह मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. या मेळाव्यामध्ये लग्न केल्यानंतर मुलगी सासरी जाण्यापूर्वी सासरच्या घरी प्रशासनातर्फे पक्के शौचालय बांधून देण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या आईच्या नावाने १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर विवाह मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांसाठी प्रतिलाभार्थी शासनातर्फे दोन हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.