शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या गर्दीने बाजार फुलला

By admin | Updated: June 13, 2017 01:21 IST

यावर्षी कधी नव्हे ते मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.

पावसाची हजेरी : पेरणीसाठी लगबग, कृषी केंद्रांमध्ये वाढली गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : यावर्षी कधी नव्हे ते मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. पुसद तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने पेरणीची लगबग वाढली आहे. बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची पुसदच्या बाजारात गर्दी दिसू लागली आहे. कृषी केंद्रात शेतकरी बियाण्यांची चाचपणी करीत आहे.पुसद शहरासह तालुक्यात गुरुवारपासून म्हणजे मृग नक्षत्राच्या दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली. तीन तासात ५५ मिमी पाऊस झाला. शुक्रवारी पुन्हा दोन तास पावसाने हजेरी लावली. १६ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री १० वाजेपर्यंत सुरू होता. या कालावधीत ३२ मिमीएवढा पाऊस झाला. मान्सूनपूर्व ८ मिमी एवढा झाला होता. आतापर्यंत १११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण याच पेरणीवर अवलंबून असल्याने शेतकरी या हंगामाच्या पेरणीसाठी मोठी काळजी करतो. कोणतीही कसर ठेवत नाही. शेतकऱ्यांसोबत बाजारपेठेचे भविष्यही याच हंगामावर अवलंबून असते. बाजारपेठेचा मुख्य कणा हा खरीप हंगामातील पेरणी असतो. व्यापाऱ्यांची खरीप हंगामापासून सुगी सुरू होते. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर बाजारपेठ शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलतो. यंदा मृगनक्षत्रात पावसाने हजेरी बऱ्याच वर्षानंतर लावली. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कामाला वेग आला असून बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे.यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी नगदी पिकाकडे वळल्याचे दिसत आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीनचा पेरा होणार आहे. यंदा कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिके सारखेच क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सध्या पुसदच्या बाजारात शेतकरी गर्दी करत असून सर्वच कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे.खरेदी केलेल्या बियाण्यांचे पक्के बिल घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहनदिग्रस : शेतकऱ्यांनी शासनाने बंदी घातलेली कोणतीही बियाणी घेवून नये. तसेच कोणत्याही कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र चालकाकडून पक्के बिल घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी.एस. बागडे यांनी केले आहे. अवैध बियाणे विक्री केल्यास त्वरित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पेरणी झाल्यानंतर बियाण्यांची पिशवी जपून ठेवावी. तसेच पिशवी खालून फोडावी. बोगस बियाणे निघाल्यास कारवाई करण्यास उपयोगी येईल. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना जागरूक राहावे, असे त्यांनी सांगितले.