शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रमजानसाठी बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:07 IST

रमजानच्या पर्वावर यवतमाळची बाजारपेठ सजली आहे. सौंदर्य प्रसाधनांसोबत विविध प्रकारचे सुगंध आणि कपड्यांचा यामध्ये समावेश आहे. मेवा आणि विदेशी फळेही बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहेत. संपूर्ण कळंब चौक रोषणाईने सजला आहे. सायंकाळ होताच या ठिकाणी चहलपहल पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देसौंदर्य साहित्य आणि कपड्यांच्या खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रमजानच्या पर्वावर यवतमाळची बाजारपेठ सजली आहे. सौंदर्य प्रसाधनांसोबत विविध प्रकारचे सुगंध आणि कपड्यांचा यामध्ये समावेश आहे. मेवा आणि विदेशी फळेही बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहेत. संपूर्ण कळंब चौक रोषणाईने सजला आहे. सायंकाळ होताच या ठिकाणी चहलपहल पहायला मिळत आहे.स्थानिक कळंब चौकात इदचा बाजार सजला आहे. या ठिकाणी विविधरंगी दुकानांनी परिसराची शोभा वाढविली आहे. पताका, झिल्ली आणि रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. ईदच्या निमित्ताने या ठिकाणी मेव्याचे दुकाने मोठ्या संख्येत लागली आहेत. यासोबतच फेनी आणि शेवईचे दुकानही आहेत.या ठिकाणी थेट सौदीअरब येथून खजूर आले आहेत. याच्या खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. खरबुज, टरबुज आंबे आणि इतर फळेही जिल्ह्यातील विविध ठिकाणासह इतर राज्यातून आली आहे. यामुळे फळांची रेलचेल झाल्याचे चित्र आहे.आभूषणांच्या खरेदीसाठी महिलाही बाजारात गर्दी करीत आहे. यामध्ये बाहुबली ज्वेलरी, पदमावती सेटची सर्वाधिक मागणी आहे. याकरिता थेट हैदराबादवरून श्रृंगार साहित्य बाजारात आले आहे. हैदराबादी कंगण, वेस्टर्न आणि जयपूर कंगणला सर्वाधिक मागणी आहे. महाराणी हारची चांगलीच चलती आहे. विविध प्रकारचे सेंट आणि अत्तर विक्रीसाठी आले आहेत. चादर आणि विविध साड्यांच्या पॅटर्न बाजारात आले आहेत. त्यात विविध टीव्ही सिरीयलमधील साड्यांच्या पॅटर्नला मागणी वाढली आहे.जकात आणि सहेरीतून मदतीचा हातएकूण उत्पन्नाचा काही हिस्सा जकातमध्ये वळता करायचा असतो. ईदच्या पूर्वी या रकमेतून धान्यासह ईदच्या साहित्याची खरेदी करण्यात येते. ते गरजवंतांपर्यंत पोहोचविले जाते. यासोबतच सहेरीमध्ये भोजनाची विशेष व्यवस्था समाज सहभागातून करण्यात येते. यासाठी शेकडो हात दररोज झटतात. बाहेरगावी असणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. ही सेवा गत अनेक वर्षांपासून पुरविली जात आहे.