शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महिला बचत गटांच्या वस्तूंना परप्रांतातही मार्केट

By admin | Updated: December 23, 2016 02:25 IST

येथील समता (पोस्टल ग्राऊंड) मैदानातील ‘समृद्धी’ प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना

गोमूत्र अर्क दिल्लीत : मासोळ्यांचे लोणचे, जूट पिशव्या व मुसळी, तीन जिल्ह्यातील बचत गटांची हजेरी रूपेश उत्तरवार यवतमाळ येथील समता (पोस्टल ग्राऊंड) मैदानातील ‘समृद्धी’ प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना स्थानिकांकडून पसंती मिळत नसली, तरी इतर राज्यांनी त्याची दखल घेतली आहे. या प्रदर्शनातील सॅनेटरी नॅपकिनला चक्क दार्जीलिंगमधून मागणी आल्याचे सांगण्यात आले. ग्राम विकास विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे या प्र्र्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात यवतमाळसह अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील बचत गट सहभागी आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथील सुलभ महिला बचत गटाने सॅनेटरी नॅपकीनचा स्टॉल लावला आहे. कंपन्यांच्या स्पर्धेत या बचत गटांनी तयार केलेले सॅनेटरी नॅपकीन दर्जेदार असल्याने थेट दार्जीलिंग, बंगळूरू, सीमला येथे पोहोचले आहे. या नॅपकीनचा दर्जा आणखी सुधारण्याच्या सूचना बटत गटाला मिळत आहे. यासाठी नवीन मशीन खरेदी करावी लागणार आहे. सध्या तीन हजार नॅपकीनची निर्मिती केली जात आहे. गटाच्या अध्यक्ष सुनिता सातपुते यांनी या नॅपकीनचा शासनस्तरावर विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोपी येथील महिला बचत गटाने गोमूत्र अर्काचा स्टॉल लावला आहे. या अर्काने १०८ रोेगांवर उपचार होत असल्याचा दावा केला जात आहे. आयुर्वेद औषधी म्हणून त्याला मोठी मागणी आहे. दिल्लीतील एका मॉलकडून या अर्काची मागणी नोंदविण्यात आली. राज्यातील इतर भागातही गोमूत्र अर्क पाठविले जात असल्याचे वनिता साखरकर यांनी सांगितले. अमरावती येथील कुमकुम महिला बचत गटाने चहा पावडर तयार केले. ग्रीन मसाला पावडर, कडीपत्ता पावडर, दुधी पावडरची निर्मिती केली. मनीषा टवलारे यांनी चहा पावडर आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितले. इंझाळा (ता.घाटंजी) येथील जिजाऊ महिला बचत गटाने सोयाबीन बिस्कीट, डाळ, ग्रीन मसाला तयार केल्याचे स्मिता ठाकरे यांनी सांगितले. घाटंजी तालुक्याच्या चिखलवर्धा येथील आदर्श बचत गटाने सहदाचा स्टॉल लावला आहे. हे शहद नैसर्गिक असल्याचा दावा रेखा सलाम यांनी केला. राळेगावातील उन्नती स्वयंसहायता गटाने मासोळयांपासून लोणचे, सेव, चकली व पापड तयार केले. हा वेगळा पदार्थ या प्रदर्शनात पाहायला मिळतो. महागाव तालुक्याच्या पिंप्री येथील संस्कृती गटाने जुटपासून पिशव्या निर्मितीचा स्टॉल लावला. पिशव्या विक्रीतून त्यांनी कर्जाची परतफेडही केल्याचे सचिव गायत्री रानडे यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातील भीमाई आणि सावित्रीबाई फुले बचत गटाने मुसळीची शेती सुरू केली. त्यापासून मुसळी पावडर निर्माण केले. या पावडरला चांगली मागणी असल्याचे उज्वला हिवराळे यांनी सांगितले. याशिवाय ठिकठिकाणच्या बचत गटांचे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आलेले आहे.