ग्रंथ प्रदर्शन : विविध विषयांवरील पुस्तकांना वाचकांची पसंती पुसद : येथील हिंदी वाचनालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गं्रथ प्रदर्शन घेण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनात कादंबरी, कथा, शैक्षणिक, वैद्यकीय साहित्य, बाल साहित्य, धार्मिक, आत्मचरित्र, क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. यावेळी मराठी भाषा दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रफुल्ल फुके, पवन पारध, मुख्याध्यापक विजय कडू आदींनी मार्गदर्शन केले. पुस्तकांचे व्यक्तीच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व असून वाचनाने सर्वांगिण विकास होण्यास मदत होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला शैलेश मंदाडे, पुसद तालुका गंथालय कर्मचारी संघटनेचे सचिव अखिलेश अग्रवाल, जयाजी काळे, मनोहर राठोड, गजानन घड्याळे, मोहन बोथरा, रामेश्वर पवार, प्रकाश कांबळे, डाखोरे, ताई काळे, ब्रीजलाल खंडापुरिया, अफसरभाई आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
वाचनालयात मराठी भाषा दिन
By admin | Updated: March 2, 2017 00:57 IST