शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनेक शाळा शौचालयांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:43 IST

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व तीन हजार ५३ शाळांमध्ये मुला-मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालये बांधलेली आहे, असे प्रतिज्ञापत्र जिल्हा परिषदेने पाच वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सादर केले.

ठळक मुद्देसीईओंनी दिले खोटे शपथपत्र : जिल्हा परिषदेतील बनवाबनवी उघड

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व तीन हजार ५३ शाळांमध्ये मुला-मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालये बांधलेली आहे, असे प्रतिज्ञापत्र जिल्हा परिषदेने पाच वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सादर केले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या बनवाबनवीचा शिक्षण समितीतून भंडाफोड केला जात आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुली, शिक्षिकांसाठी स्वतंत्र शौचालये, स्वतंत्र मूत्रीघरे नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये राज्य शासनाला फटकारले होते. शिक्षण सचिवांना न्यायालयात हजर राहण्यास बजावले होते. त्यामुळे सचिवांनी सर्व जिल्हा परिषदांकडून शौचालयांची माहिती मागविली. त्या आधारे त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी पुरेसे स्वतंत्र शौचालय बांधण्यात आल्याचे त्यात म्हटले होते.या प्रतिज्ञापत्रासाठी तत्कालीन सीईओ नवलकिशोर राम यांनीही शिक्षण सचिवांकडे आपले प्रतिज्ञापत्र रवाना केले. ते शिक्षण विभागाच्या माहितीनुसार त्यांनी दिले. त्यात सर्व तीन हजार ५३ शाळांपैकी १३३ शाळांमध्ये मुलांसाठी, तर ९३३ शाळांमध्ये मुलींसाठी जानेवारी २०१२ पर्यंत शौचालये उपलब्ध नव्हती. मात्र, तातडीने बांधकाम करून मार्च २०१२ पर्यंत ही कमतरता भरून काढण्यात आली व सर्वच शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये असल्याचे म्हटले होते.न्यायालयापुढे तद्दन खोटी माहिती सादर करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेतून होत आहे. त्या प्रतिज्ञापत्रानुसार आज जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये उपलब्ध नाहीत. चक्क यवतमाळ शहरातील जिल्हा परिषद शाळेतही मुलींच्या शौचालयांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे खोटी माहिती देणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.