शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचे गणित बिघडले

By admin | Updated: April 5, 2015 00:05 IST

तालुक्याील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण तालुका प्रशासनाने घोषित केले.

गावपुढारी हादरले : महिला आरक्षण टाकणार विरजणवणी : तालुक्याील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण तालुका प्रशासनाने घोषित केले. सरपंच बनण्यासठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या अनेक गावपुढाऱ्यांची मात्र यामुळे गोची झाली. अनेक जण जागेवरच हिरमुसले, तर आरक्षित कोट्यातील अनेकांना संधी चालून येत असल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले.तालुक्यातील १०१ पैकी ४० ग्रामपंचायतींची मुदत येत्या मे महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासोबतच २३ गावांतील ५९ सदस्यांच्या रिक्त जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. आरक्षणामुळे पोटनिवडणूक होणाऱ्या गावातही सरपंच पदामध्ये फेरबदल होण्याचे संकेत आहे. २२ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत निवली, वागदरा, घोन्सा, पुनवट या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने अनेक पुढाऱ्यांच्या हातून संधी गेली आहे. मारेगाव (को.), पिंपळगाव, शिरपूर या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने काहींना आयतीच संधी चालून येणार आहे. मात्र यापैकी महिलांसाठीचे आरक्षण उद्या ५ एप्रिलला काढले जाणार आहे. महिलांचे आरक्षण निघाल्यानंतर अनेक पुरूषांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. ढाकोरी (बोरी), वारगाव, तेजापूर, भांदेवाडा, नांदेपेरा, कुर्ली, येनक, चनाखा येथील पोट निवडणुकामुळेही सरपंच पदाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.पुढील वर्ष-दोन वर्षात होणाऱ्या काही ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण निघाल्याने अनेक मातब्बर गावपुढाऱ्यांची सत्ता संपुष्टात येणार आहे. आरक्षित इच्छुक उमेदवारांना गावाच्या मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यास वेळ मिळणार असल्याने इच्छुक उमेदवार आता कामाला लागून आपली गावात छाप पाडण्याचे प्रयत्न करणार आहेत. यामध्ये पुनवट, वेळाबाई, चिखलगाव, गणेशपूर, शिंदोला, कायर, राजूर (कॉ.), लालगुडा, तरोडा, लाठी, उकणी येथील सरपंचपदासाठी भविष्यात प्रचुड चुरस राहणार आहे. मात्र वास्तव परिस्थिती महिला आरक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे. १०१ पैकी ५२ ग्रामपंचायतींमध्ये महिला राज येणार आहे. त्यामुळे अनेक गावपुढाऱ्यांवर महिलेला पद देऊन स्वत: पडद्याआडून राजकारण करण्याची वेळ येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)महत्वाच्या ग्रामपंचायती झाल्या आरक्षिततालुक्यातील चिखलगाव, शिरपूर, घोन्सा, नांदेपेरा, सावर्ला, बोर्डा, सुकनेगाव, कायर, रासा, लालगुडा आदी ग्रामपंचायती महत्त्वाच्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागलेले असते. यापैकी घोन्सा ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, तर शिरपूर, चिखलगाव, बोर्डा येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या गावांतील सरपंच पदावर डोळा असलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. आता त्यांना संबंधित प्रवर्गातील उमेदवाराला खूर्ची सोपवून पडद्याआडूनच सर्व हालचाली कराव्या लागणार आहे.