शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मॅन्युअल टंकलेखन निर्णयाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:00 IST

दोन वर्षांची मुदतवाढ मिळालेल्या मॅन्युअल टायपिंगला प्रवेशाविषयी परीक्षा परिषद द्विधा मनस्थितीत आहे. नवीन सत्राला प्रवेश बंदचा निर्णय नऊ दिवसात बदलविल्याने ही बाब स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये संभ्रम नऊ दिवसात निर्णय बदलविला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन वर्षांची मुदतवाढ मिळालेल्या मॅन्युअल टायपिंगला प्रवेशाविषयी परीक्षा परिषद द्विधा मनस्थितीत आहे. नवीन सत्राला प्रवेश बंदचा निर्णय नऊ दिवसात बदलविल्याने ही बाब स्पष्ट होत आहे. परिषदेचा सुरू असलेला हा खेळखंडोबा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे.शासकीय कार्यालयाचे संपूर्ण कामकाज संगणकावर चालत आहे. काळानुरूप बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगत शासनाने सन २०१७ मध्ये मॅन्युअल टायपिंग थांबविण्याचा निर्णय घेतला. कॉम्प्युटर टायपिंग सुरू करण्यात आली. मात्र काही टायपिंग इन्स्टिट्यूटने पाठपुरावा केल्याने मॅन्युअल टायपिंगला नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जुलै २०१९ ची परीक्षा मॅन्युअल टायपिंगवर झाली.मुदतवाढीनुसार जुलै ते डिसेंबर २०१९ हे सत्र शिल्लक आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी २५ जुलै २०१९ च्या पत्रानुसार या शिल्लक असलेल्या सत्राला विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे टायपिंग इंस्टिट्यूट संस्थांना कळविले. तसी प्रसिध्दीही झाली. मात्र परिषदेने २ आॅगस्ट रोजी सदर पत्र रद्द केले. रद्द करण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रवेश थांबविण्याचा निर्णय परिषदेने का घेतला आणि लगेच का बदलविला, याची चर्चा आता टायपिंग इंन्स्टिट्यूट क्षेत्रात सुरू झाली आहे.कॉम्प्युटर टायपिंगचे विद्यार्थी वाढलेराज्यातील सुमारे ३५०० टायपिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मॅन्युअल टायपिंगची परीक्षा देणारे २०१४ मध्ये दोन लाख ९० हजार ३८४ विद्यार्थी होते. जुलै २०१९ या सत्रात केवळ ६२ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. याच सत्रात कॉम्प्यूटर टायपिंगची परीक्षा देणारे दोन लाख २५ हजार विद्यार्थी आहेत. मागील काही वर्षात कॉम्प्यूटर टायपिंगचे विद्यार्थी वाढले आहेत.शासनाने मॅन्युअल टंकलेखन परीक्षेला दोन वर्षे मुदतवाढ दिली आहे. यानुसार जुलै ते डिसेंबर २०१९ हे शेवटचे सत्र आहे. या सत्राला प्रवेश देऊ नका, असे परीक्षा परिषद आयुक्तांनी २५ जुलैच्या पत्रात नमूद केले होते. या आदेशासंदर्भातील पत्र रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाचे स्वागत करतो.- प्रकाश कराळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनापरीक्षा परिषद आयुक्त पुणे यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन प्रवेश थांबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना केवळ परीक्षा घेण्याचा अधिकार आहे. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर पत्र रद्द करण्यात आले. कुठलाही निर्णय शासनाच्या निर्देशानुसार होणे अपेक्षित आहे.- दिनेश हरणे, अध्यक्ष, मॅन्युअल टायपिंग संघर्ष समिती

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र