शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरराव नाईकांची विधानसभेतून माघार

By admin | Updated: August 27, 2014 23:51 IST

अखेर विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांनी माघार घेतली आहे. बुधवारी मुंबईत पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला गैरहजर राहिल्याने

पुसदमधून आता ययाती नाईक लढणार : मुंबईत दिली राष्ट्रवादीकडून मुलाखत, नीलय नाईकांचीही उपस्थिती यवतमाळ : अखेर विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांनी माघार घेतली आहे. बुधवारी मुंबईत पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला गैरहजर राहिल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे. दरम्यान पुसद विधानसभा मतदारसंघासाठी ना. नाईकांचे पूत्र तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी मुलाखत दिल्याने त्यांचा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. गेल्या चार टर्मपासून पुसद विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री मनोहरराव नाईक यावेळी विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत साशंकता होती. प्रकृती अस्वास्थ हे प्रमुख कारण त्यासाठी सांगितले जाते. मनोहरराव नाईक न लढल्यास त्यांच्या कुटुंबातून पत्नी अनिताताई नाईक, मुलगा ययाती नाईक की इंद्रनिल नाईक अशी नावे चर्चेत होती. प्रत्येक जिल्ह्यातून एक महिला उमेदवार द्यायचे झाल्यास अनिताताई नाईकांचे नाव निश्चित होईल, असेही मानले जात होते. मात्र बुधवारी मुंबईत पार पडलेल्या मुलाखतींनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला गेला आहे. मनोहरराव नाईक हे मुलाखतीसाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय समितीपुढे उपस्थित झाले नाही. त्यांच्याऐवजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी पुसद विधानसभेची उमेदवारी मागितली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण परिश्रम करून काँग्रेसच्या उमेदवाराला २१ हजार २४१ मतांची आघाडी मिळवून दिली. आपण गेल्या चार वर्षांपासून पुसद विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे मलाच विधानसभेची उमेदवारी मिळावी, अशी विनंती वजा युक्तीवाद ययाती नाईक यांनी केला. यावेळी नाईक परिवारातीलच सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक हेसुद्धा मुलाखत स्थळी उपस्थित होते. मुलाखत स्थळी नाव जाहीर होताच निलय नाईक जागेवरच उभे झाले, यावेळी शरद पवार यांनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला, स्मीत हास्य केले, त्यानंतर निलय नाईक तेथेच पुन्हा बसल्याचे सांगण्यात आले. मनोहरराव नाईक यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुलगा ययाती यांना विविध स्तरावर प्रोजेक्ट करणे सुरू केले होते. तेव्हापासूनच आगामी विधानसभा निवडणूक मनोहरराव नाईक लढणार नाहीत, असे संकेत मिळत होते. अखेर मुलाखतींनी ही बाब स्पष्ट केली. मुलाला मुलाखतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट केले असले तरी पक्ष नेमका काय निर्णय घेतो यावर बरेच काही अवलंबून असल्याचे ना. नाईकांच्या पुसद येथील बंगल्यातून जबाबदार सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुलाला रिंगणात उतरविले असले तरी मताधिक्याने निवडून आणण्याचे आव्हान ना. नाईकांपुढे राहणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी) सातही विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या मुलाखतीयवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांनी मुंबईत मुलाखती दिल्या. वणी आणि उमरखेड मतदारसंघात इच्छुकांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली. वणी विधानसभा मतदारसंघातून पाच, उमरखेड आठ, पुसद दोन तसेच यवतमाळ, दिग्रस, आर्णी, राळेगाव या चार मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराने विधानसभेसाठी मुलाखत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व २८८ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यावरून काँग्रेसने बरीच आगपाखड केली होती. त्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून २८८ मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या नसल्याचे खंडन केल्याबाबतचे वृत्तही झळकले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील सातही मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने मुलाखती घेतल्याने पुन्हा संभ्रम वाढला आहे. आम्ही सर्वच मतदारसंघात लढू शकतो, असा संदेश राष्ट्रवादीला या मुलाखतीतून काँग्रेसला द्यायचे असल्याचे दिसते.