शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून मंगीची शाळा उघडलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:56 IST

शिक्षकच आले नसल्याने जिल्हा परिषदेची शाळा मागील तीन दिवसांपासून उघडलीच गेली नाही. हा प्रकार मंगी (ता.राळेगाव) येथे सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाऊन परत यावे लागत आहे. वरिष्ठांकडूनही हा प्रकार गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशिक्षकांचा शोध : विद्यार्थी शाळेबाहेर, वरिष्ठांकडूनही प्रतिसाद नाही

मंगेश चवरडोल ।लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : शिक्षकच आले नसल्याने जिल्हा परिषदेची शाळा मागील तीन दिवसांपासून उघडलीच गेली नाही. हा प्रकार मंगी (ता.राळेगाव) येथे सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाऊन परत यावे लागत आहे. वरिष्ठांकडूनही हा प्रकार गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.मंगी येथील जिल्हा परिषद शाळेत एक ते पाच वर्ग असून पटावर ३६ विद्यार्थी आहेत. सकाळी १० ते ५ अशी शाळेची वेळ आहे. २८ डिसेंबरपासून शाळेच्या आज (सोमवारी) तिसऱ्या दिवशीही शाळेचे प्रवेशद्वार उघडले गेले नाही. विद्यार्थी दिवसभर शिक्षकांची वाट पाहतात.राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या या शाळेची दैना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि वरिष्ठांकडूनही दुर्लक्षित आहे. खैरी केंद्रशाळे अंतर्गत मंगी शाळा येते. वर्ग भरत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. शाळा न उघडल्यास आणि आवश्यक तेवढे शिक्षक न दिल्यास पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना शिक्षण विभागाला काहीही सोयरसुतक नाही.गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केले दुर्लक्षमंगी येथील शाळेत नियमित शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शुक्रवार, शनिवार, सोमवार असे तीन दिवस शाळा उघडली नाही. केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली, त्यांनी दुर्लक्ष केले. अजूनही उपाययोजना न झाल्यास विद्यार्थ्यांसोबत राळेगाव पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे मंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ राऊत यांनी सांगितले.दोनही शिक्षक गैरहजरमंगी शाळेला दोन शिक्षक मंजूर आहे. त्यातील एक कायम, तर एक प्रतिनियुक्तीवर आहे. २८ डिसेंबरपासून एकही शिक्षक शाळेत पोहोचले नाही. शिक्षकांच्या गैरहजेरीविषयी पंचायत समितीचे अधिकारीही अनभिज्ञ आहेत.गटशिक्षणाधिकाऱ्यांना बोलून संबंधित शिक्षक व केंद्र प्रमुखांवर कारवाई केली जाईल. जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीतही हा विषय घेतला जाईल.- प्रीती काकडे,सदस्य, जिल्हा परिषद