शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

अप्रशिक्षित मुख्याध्यापकांमुळे बिघडले शाळांचे व्यवस्थापन

By admin | Updated: July 8, 2016 02:25 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन शाळांकडून दैनंदिन कामांबाबत मोठ्या अपेक्षा बाळगत आहे.

आदेश दुर्लक्षित : हजारो शिक्षक पदविका घेऊनही पदोन्नतीपासून वंचितयवतमाळ : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन शाळांकडून दैनंदिन कामांबाबत मोठ्या अपेक्षा बाळगत आहे. मात्र, प्राथमिक शाळांमध्ये ‘प्रशिक्षित’ मुख्याध्यापकांची वानवा आहे. त्यामुळे सरकारीसह खासगी प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन बिघडले आहे. त्याचवेळी हजारो शिक्षकांनी प्रशिक्षण घेतलेले असतानाही त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळालेली नाही, असे विचित्र वास्तव पुढे आले आहे.प्रत्येक शाळा दर्जेदार होण्यासाठी शाळेला योग्य प्रशासक असण्याची गरज आहे. त्यामुळेच मुख्याध्यापक कार्यकुशल असावा यासाठी राज्य शासनाने २००५ मध्ये शासन निर्णय निर्गमित करून मुख्याध्यापकासाठी शालेय व्यवस्थापन पदविका मिळविणे बंधनकारक केले आहे. मात्र, अद्यापही अनेक मुख्याध्यापकांकडे शालेय व्यवस्थापन पदविका नाही. विशेष म्हणजे, ही पदविका मिळविलेल्या शिक्षकांची संख्या मात्र हजारोच्या घरात आहे. पण त्यांना मुख्याध्यापक म्हणून बढती मिळालेली नाही. मुख्याध्यापक पदावर काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने १९९४ साली शालेय व्यवस्थापन पदविका हा अभ्यासक्रम सुरू केला. अनुनभवी व व्यवस्थापन शास्त्राचे ज्ञान नसलेले शिक्षक मुख्याध्यापक पदावर पदोन्नत झाल्याने त्यांची शालेय प्रशासनावर पकड नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे शासनाने २००५ मध्ये उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर शिक्षकांना बढती देण्यापूर्वी शालेय व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम बंधनकारक केला. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी शासनाने हा आदेश लागू केला होता. मात्र, केवळ माध्यमिक शाळांनीच हे बंधन पाळले. प्राथमिक शाळांमध्ये अद्यापही केवळ सेवाज्येष्ठतेच्या निकषावरच मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली जात आहे. त्यामुळे अकुशल मुख्याध्यापकांची संख्या वाढली आहे.वास्तविक, मुक्त विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम केवळ एक वर्षाचा असून तोही पत्राद्वारे उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक मुख्याध्यापकांनी पाठ फिरविली तरी शिक्षकांनी मात्र मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन ही पदविका मिळविली आहे. प्राथमिक शाळांमधील अशा हजारो शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळण्याची अपेक्षा आहे. शासन मात्र, याबाबतीत निर्णय घेण्यास तयार नाही. (स्थानिक प्रतिनिधी)नाही संगणकाचा गंधप्राथमिक शाळेतील अनेक मुख्याध्यापकांना संगणकाची माहिती नाही. त्यामुळे शालार्थमधील वेतन बिले तयार करण्याचे कामही ते बाहेरील शिक्षकांकडून करवून घेतात. त्यासोबतच इतरही अनेक कामांमध्ये सहायक शिक्षकांच्या मदतीशिवाय मुख्याध्यापकांचे पानही हलत नाही. त्यामुळेच प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदासाठी शालेय व्यवस्थापन पदविका बंधनकारक करण्याची मागणी करण्यात येत आहे.महाराष्ट्रात हजारो प्राथमिक शिक्षकांनी शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मात्र, त्यांना मुख्याध्यापक पदावर बढती मिळालेली नाही. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्रभावी ठरण्यासाठी शाळेत कुशल प्रशासक गरजेचाच आहे. त्यासाठी आम्ही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बढती देण्याची मागणी केली आहे. - दिवाकर राऊत, जिल्हाध्यक्ष, इब्टा संघटना यवतमाळ