शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आजंती येथे मलकोजी यात्रा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:57 IST

संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

ठळक मुद्दे५०० वर्षांपूर्वीची परंपरा : सर्वधर्म समभावाचे प्रतीक

ऑनलाईन लोकमतनेर : संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. दोन दिवसांचा हा उत्सव ग्रामस्थ आंनदाने साजरा करतात.मलकोजी महाराज सन १४९९ ला चांदूररेल्वे तालुक्याच्या वाकपूर (दादापूर) येथून आजंतीला आले. त्यांनी राऊळ (मंदिर) बांधण्यासाठी ग्रामस्थांना जागा मागितली. सुरुवातीला ग्रामस्थांनी नकार दिला. नंतर जागा मिळाल्यानंतर मलकोजी महाराजांनी कारंजा लाड येथून कारागिरांना बोलावून मंदिर बांधकामाला सुरुवात केली. ई.स. १४९९ ते १५७० या काळात मोगल बादशाहाची सत्ता होती. मलिन नावाचा राजा मंदिरे उद्ध्वस्त करत होता. राज्याने मंदिर पाडू नये म्हणून मंदिराचा समोरील भाग मशिदीसारखा बांधण्यात आला. मूळ मलकोजी शामजी ढळे यांची १५७१ साली समाधी बांधण्यात आली. त्यांना आशा व मनिशायी या दोन पत्नी होत्या. त्यांना संभाजी, निंबाजी, चिंताजी ही तीन मुले होती. चितांजीच्या पाचव्या पिढीतील नागोजी ढळे यांच्या मंदिरात समाध्या आहेत. हे मंदिर एकात्मतेचे प्रतीक आहे.दर गुरुवारी याठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. महाराज घोंगटीतून हात घालून गरिबांना राणी छाप नानी वाटायचे. मंदिराचा खर्च याच नाण्यातून करण्यात आला, असे सांगितले जाते. २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तमाम भक्त महाप्रसादाचा लाभ घेतील. उत्सवासाठी भक्त मंडळी पुढाकार घेत आहे.