शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहरातील मुख्य रस्ते वाहनांसाठी की जनावरांसाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:35 IST

मोकाट जनावरांमुळे यवतमाळचे रस्ते जाम झाले आहेत. कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला मोकाट जनावरे दिसतीलच. अशा स्थितीत वेगाने वाहन चालवले तर अपघात होणारच. याचा अनुभव वाहनचालकांना दररोज येत आहे. नगरपरिषद प्रशासन मात्र उपाययोजना करण्यासाठी तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोकाट जनावरांमुळे यवतमाळचे रस्ते जाम झाले आहेत. कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला मोकाट जनावरे दिसतीलच. अशा स्थितीत वेगाने वाहन चालवले तर अपघात होणारच. याचा अनुभव वाहनचालकांना दररोज येत आहे. नगरपरिषद प्रशासन मात्र उपाययोजना करण्यासाठी तयार नाही.नगरपरिषदेने शहरातून जाणारे महामार्ग स्वत:च्या ताब्यात घेतले. या मार्गाच्या देखरेखीची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. तेथील मोकाट जनावरांना नियंत्रित करण्याचे कामही नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर आहे. त्या दृष्टीने एका प्रभागासाठी दोन या प्रमाणात ५८ सफाई कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. असे असले तरी कोणीच मोकाट जनावरांना नियंत्रित करीत नाही. आता तर या जनावरांना रस्त्यांच्या सौंदर्यीकरणामुळे रान मोकळे झाले आहे. रस्ता दुभाजकांवर आणि गार्डनमध्ये ही जनावरे मुक्तपणे संचार करत आहेत. या ठिकाणची हिरवळ फस्त करीत आहेत. यामुळे लाखोंचा खर्च व्यर्थ जाणार आहे.ज्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे प्रशासनातील अधिकारीही अवाक्षर काढत नाही. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे.कोंडवाड्याचा लाखोंचा खर्च व्यर्थमोकाट जनावरांना शिस्त लावण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती झाली आहे. नगरपरिषदेच्या बजेटमध्ये त्याचे नियोजनही करण्यात येते. मात्र यानंतरही या कोंडवाड्यात वर्षभरात किती जनावरे जातात, हे कोडेच आहे.वर्दळीच्या मार्गावरच जनावरांचा ठिय्यायवतमाळ शहरातील दारव्हा, अमरावती, धामणगाव, नागपूर, पांढरकवडा मार्गावर जागोजागी मोकाट जनावरांचे कळप दिसतात. हे सर्व अत्यंत वर्दळीचे रस्ते आहेत. आता हे कळप दत्त चौक, जिल्हाधिकाºयांचे निवासस्थान, पोलीस अधीक्षक कार्यालय, बसस्थानक चौक, तहसील चौक या ठिकाणीही पाहायला मिळत आहेत. इतकेच नव्हेतर आता रस्ता दुभाजकांच्या मध्येही चरताना दिसतात. दररोजच्या या प्रकारानंतरही नगरपरिषद मात्र गप्प आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक