शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘अरुणावती’चा मुख्य उजवा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:56 IST

यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच.....

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना : लाखो लिटर पाणी जात आहे वाया

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच दुसरीकडे मात्र शेतकºयांच्या पिकासाठी अरुणावतीचा उजवा मुख्य कालवा सोडताना नियोजनाअभावी हा कालवा फुटून दर तासाला लाखो लिटर पाणी वाया गेले.कार्यकारी अभियंता व संबंधित कर्मचाºयांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. अरुणावतीच्या उजव्या मुख्य कालव्यास साधारणत: चार ते पाच दिवसांपासून तूर, कापूस पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यानंतर संबंधित अधिकाºयांच्या भेटी त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. सकाळच्या सुमारास अचानक कालव्यात जास्त पाणी सोडण्यात आले. अशातच दुपारी ४ वाजता तुपटाकळी ते बेलुरा रोडवरील उजव्या मुख्य कालव्याला ५० फुटापर्यंत गायकी यांच्या शेताजवळ ओलावा फुटला. साधारणत: ६ वाजेपर्यंत कुणीही अधिकारी, कर्मचारी याकडे फिरकला नाही. पाणी वाया जात असताना शेतकरीवर्ग हतबलपणे केवळ पाहात होते. काही शेतकºयांनी तत्परतेने कार्यकारी अभियंता व इतर कर्मचाºयांना फोन लावले. परंतु सर्व कॉल संपर्क कक्षेच्या बाहेर येत होते. तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काही प्रमाणात हालचालीला वेग आला. मागील वर्षीसुद्धा उजवा मुख्य कालवा लाख (रायाजी) गावाजवळ फुटला होता.यावर्षी अरुणावती प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्केच पाणीसाठा आहे. या मोजक्या पाणीसाठ्यातून शेतीला पाणी दिल्या जात आहे. अशा स्थितीत मुख्य उजवा कालवा फुटल्याने दुष्काळात तेरावा महिना आला आहे. कार्यकारी अभियंत्याच्या थोड्याशा दुर्लक्षितपणामुळे हा प्रसंग निर्माण झाला आहे, तर सहायक कार्यकारी अधिकारी यांचेही ढिसाळ नियोजन यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळेच आजपर्यंत शेताच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचविण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे.योग्य नियोजनाचा अभावमागील वर्षी १०० टक्के धरण भरूनही कालव्यांना मनमानी पाणी सोडण्यात आले होते. योग्य नियोजन नसल्यामुळे यावर्षी हरभरा पिकाला पाणी मिळू शकले नाही. लाखो लिटर पाणी काही वेळातच वाया गेले. एकीकडे पीक परिस्थिती वाईट असताना आणि येत्या उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासण्याची शक्यता असताना अधिकारीवर्गाच्या अशा दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.