शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विक्रेत्यांवर नेर कृषी विभाग मेहेरबान

By admin | Updated: August 10, 2014 23:14 IST

सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या निष्कर्षाप्रत कृषी विभाग पोहोचला. मात्र संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. हा विभाग त्यांच्यावर एवढा मेहेरबान का, असा साधार

नेर : सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या निष्कर्षाप्रत कृषी विभाग पोहोचला. मात्र संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. हा विभाग त्यांच्यावर एवढा मेहेरबान का, असा साधार प्रश्न फसगत झालेल्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दुबार पेरणीने आर्थिकदृष्ट्या मोडलेला बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत आहे. गारपीट आणि परतीच्या पावसामुळे बियाण्याचे सोयाबीन हाती लागले नाही. बोगस सोयाबीन बियाणे बाजारात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु नाईलाजास्तव काही शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु चांगल्या पावसानंतरही बियाणे उगवले नाही. याविषयीच्या तक्रारी कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात झाल्या. यावर चौकशीही करण्यात आली. त्यात बियाण्यांची उगवण क्षमताच नव्हती असा निष्कर्ष काढण्यात आला. परंतु संबंधित विक्रेत्यांवर कारवाईस टाळाटाळ होत आहे. वटफळी, मोझर, सारंगपूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ‘एसीएन’ कंपनीच्या बियाण्यांचा वापर केला होता. शिवाय कृषी विभागाने वितरित केलेल्या महाबीजचीही पेरणी झाली होती, अशा तक्रारींवर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुक्यातील दोन कृषी अधिकारी आणि कंपनीचा एक प्रतिनिधी यांनी बियाणे उगवले नसलेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात त्यांना बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास आले. या बाबीची माहिती संबंधित वरिष्ठांना देण्यात आली. मात्र कारवाईबाबत निश्चित सांगितले गेले नाही. कृषी अधिकारी झंझाळ यांनीही बियाण्यांची उगवणशक्ती नसल्याचे सांगितले. मग कारवाईस विलंब का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेताच्या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्यांनी ठरविलेल्या धोरणानंतर कारवाई होईल, असे सांगितले जाते.दरम्यान, अजूनही पाहणीचे पंचनामे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. मात्र सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीविषयी कृषी विभागाजवळ कुठलेही उत्तर नाही. बियाणे कंपन्यांनी हात वर केले तर कृषी विभाग कागदी घोडे नाचवित असल्याने बळीराजा दुहेरी समस्येत अडकला आहे. (तालुका प्रतिनिधी)