शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा अजब खाक्या; थकबाकी शासनाची बदनामी मात्र जनतेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:18 IST

विविध योजनांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात शासनाकडेच वीज महावितरण कंपनीचे हजारो कोटी रुपये थकीत आहे.

ठळक मुद्दे३४ हजार ४९५ कोटी थकीत बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांकडेच

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध योजनांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात शासनाकडेच वीज महावितरण कंपनीचे हजारो कोटी रुपये थकीत आहे. त्या वसुलीवर अधिक जोर न देता महावितरण कंपनी सामान्य ग्राहकांकडे असलेल्या थोड्याथोडक्या रकमेसाठी ‘मोहीम’ राबवून अप्रत्यक्षरीत्या जनतेचीच बदनामी करताना दिसते आहे.वीज पुरवठा सुरू असलेल्या एक लाख १३ हजार १९५ ग्राहकांकडे २७ हजार ९३५ कोटी तर वीज पुरवठा खंडित केलेल्या ३२ लाख ८३ हजार ९०६ ग्राहकांकडे सहा हजार ५६० कोटी थकीत आहे. या दोन्ही मिळून एक कोटी ४५ लाख १०१ ग्राहक थकबाकीदार असून त्यांच्याकडे वीज महावितरण कंपनीचे तब्बल ३४ हजार ४९५ कोटी रुपये थकीत आहे. या एकूण थकबाकीच्या रकमेपैकी ७३ टक्के थकबाकी ही पाणीपुरवठा योजना, पथदिवे व कृषीपंपधारक ग्राहकांची आहे. पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांची थकबाकी ही महाराष्ट जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपंचायती व महानगरपालिकांकडे आहे. याशिवाय काही शासकीय कार्यालयांकडेसुद्धा मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. शासनाने अनुदान न दिल्याने ही रक्कम थकीत झाली आहे. एकूण थकबाकीपैकी ७३ टक्के थकबाकी ही पाणीपुरवठा, दिवाबत्ती व कृषीपंपांची असल्याचे खुद्द उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनीच विधीमंडळात कबूल केले आहे.सामान्य वीज ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरण नेहमीच मोहीम राबविते. पोलीस बंदोबस्तात धडक देऊन थोड्याशा रकमेसाठी वेळप्रसंगी वीज वितरण खंडित केला जातो. मात्र बहुतांश थकबाकी शासकीय कार्यालयांकडे असताना तेथील पुरवठा तोडण्याची ‘कामगिरी’ महावितरणने केल्याचे कुठेही ऐकिवात नाही. कृषीपंपाच्या थकबाकी वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना राबविली जात आहे.

सहा हजार कोटींची सुरक्षा ठेवमहावितरणकडे सर्व प्रकारच्या विद्युत ग्राहकांची तब्बल सहा हजार ७५ कोटी ६३ लाख रुपयांची सुरक्षा ठेव जमा आहे. या रकमेवर सरासरी १०.७५ टक्के दराने व्याज देण्याचे नियामक आयोगाचे आदेश आहे. केवळ सर्व्हिस लाईन चार्जेस व मीटर भाड्यापोटी महावितरणने ३६७ कोटी रुपये ग्राहकांकडून वसूल केले आहे. आयोगाने या रकमाही व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महावितरणने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तशा सूचना केल्या आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण