शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

रबी पिकांना बसणार महावितरणचा शॉक

By admin | Updated: November 23, 2014 23:26 IST

भारनियमन, खंडित वीज पुरवठा, जळणाऱ्या डीपी आणि कमी दाबाच्या वीज पुरवठा यंदाच्या रबी हंगामाला जबरदस्त शॉक देणार आहे. रबीची लगबग पुसद उपविभागात सुरू झाली असली तरी विजेची

पुसद : भारनियमन, खंडित वीज पुरवठा, जळणाऱ्या डीपी आणि कमी दाबाच्या वीज पुरवठा यंदाच्या रबी हंगामाला जबरदस्त शॉक देणार आहे. रबीची लगबग पुसद उपविभागात सुरू झाली असली तरी विजेची समस्या शेतकऱ्यांना संकटात आणणारी ठरू शकते. खरीप हंगामाने दगा दिल्यानंतरही पुसद उपविभागातील शेतकरी रबीच्या तयारीला लागले आहे. गहू, हरभरा पिकांचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. मात्र त्यांच्या मनात वीज समस्येची कायम धास्ती आहे. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यात तब्बल आठ ते दहा तासाचे भारनियमन केले जाते. कृषी फिडरवर तर केवळ रात्रीच वीज पुरवठा होत आहे. त्याचा फटका रबी हंगामाला बसू शकत आहे. विजेची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. उपविभागात कुठेही पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नाही. त्यातच वीज चोरांचेही समस्या कायम आहे. उपविभागात अनेक वर्षांपासून असलेले वीज साहित्य आजही उपयोगात आहे. अनेक गावातील वीज खांब वाकलेले आहे. त्यावरून तारा लोंबकळत आहे. अर्थिंगचे तार जीर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी डीपी उघड्यावर आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होतच नाही. विजेची समस्या घेऊन उपविभागातील शेतकरी वीज वितरणचे उंबरठे झिजवितात. परंतु कोणताही अधिकारी या शेतकऱ्यांचे समाधान करीत नाही. भारनियमनाव्यतिरिक्त खंडित होणारा वीज पुरवठा मोठी डोकेदुखी आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाला की दुरुस्तीसाठी कोणीही येत नाही. आठ-आठ दिवस कृषी फिडर बंद असते. यासोबतच कमी दाबाचा वीज पुरवठा मोटारपंप जाळण्यात हातभार लावत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावले आहे. परंतु मोटारपंप जळण्याची भीती असल्याने शेतकरी ओलित करण्यास मागेपुढे पाहतात. या सर्वांवर मात करीत रबीचे ओलित कसे करावे, असा प्रश्न आहे. भारनियमनासोबतच मजुरांची समस्याही कायम आहे. रात्री बे रात्री ओलित करण्यासाठी मजूर येण्यास तयार नसतात. कृषी फिडरवरची वीज रात्रीच सुरळीत राहत असल्याने रात्रीच ओलित करावे लागते. अशा स्थितीत शेतकऱ्याला हातात फावडे घेऊन ओलित करण्याशिवाय पर्याय नसतो. (वार्ताहर)