शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

महावितरण कर्मचाऱ्यांची निवासस्थाने जीर्णावस्थेत

By admin | Updated: May 20, 2015 00:13 IST

तालुक्यातील घोन्सा येथील विद्युत उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महावितरणे येथे निवासस्थाने बांधली आहेत.

कर्मचारी संकटात : घराला झुडुपांचा वेढावणी : तालुक्यातील घोन्सा येथील विद्युत उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महावितरणे येथे निवासस्थाने बांधली आहेत. मात्र या निवासस्थानांच्या बांधणीनंतर त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता ही निवासस्थाने जीर्ण झाली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना तेथे वास्तव्य करणे कठीण झाले आहे.घोन्सा येथे महावितरणचे ३३ के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र आहे़ महावितरणचे कनिष्ठ अभियंता कार्यालयही येथे आहे. या केंद्रातून परिसरातील जवळपास २0 ते २५ गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे हे उपकेंद्र परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठीच येथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी महावितरणतर्फे निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यात कर्मचाऱ्यांनी वास्तव्य करून ग्राहकांना योग्य सेवा द्यावी, अशी अपेक्षा होती.महावितरणने घोन्सा येथे निवासस्थाने बांधली खरी, मात्र नंतर त्यांच्या दुरुस्ती आणि डागडुजीकडे दुर्लक्ष केले. तरीही जीर्ण झालेल्या या निवासस्थानांमध्ये काही कर्मचारी कसेबसे वास्तव्य करीत आहे़ तथापि गेल्या कित्येक वर्षांपासून या निवासस्थानांची दुरूस्ती न झाल्यामुळे ही निवासस्थाने आता भकास झाली आहे. त्यांचा मूळ चेहराच गायब झाला आहे. काही निवासस्थानांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असून प्रसाधन गृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रसाधन गृहांमधून आता दुर्गंधी पसरत आहे़ त्याचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना होत आहे. महावितरणच्या या निवासस्थानांसभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ या घाणीची दुर्गंधी सुटल्याने त्यात वास्तवय करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यांचे कुटुंबिय जीव मुठीत धरून तेथे वास्तव्य करीत आहे. विशेष म्हणजे या निवासस्थानांच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी येत असल्याचे समजते. तथापि हा कोणत्या निवासस्थानांच्या दुरुस्तीवर अथवा डागडुजीवर खर्च केला जातो, हे एक कोडेच आहे. त्यामुळे हा निधी नेमका जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आता महावितरणच्या वरिष्ठांनीच तपासणी करण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)दुरूस्तीची गरजमहावितरणकडून कर्मचारी निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी खरच निधी येतो किंवा नाही, याबाबत खात्रीशील माहिती उपलब्ध नाही. तथापि या निवासस्थानांच्या तातडीच्या दुरुस्तीची मात्र गरज आहे. त्वरित दुरुस्ती न केल्यास यापैकी काही निवासस्थाने कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या दिवशी रात्रीच्या सुमारास निवासस्थान कोसळले, तर त्यात वास्तव्य करणाऱ्या कमचाऱ्यांच्या कुटुंबाची मात्र वाताहात होण्याची शक्यता आहे. कुणाचा बळी जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या निवासस्थानांची तातडीने दुरुस्ती, डागडुजी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी या समस्येकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे.