शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वैभवनगरात महावंदना व धम्मदेसना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:10 IST

येथील वैभवनगरातील त्रिरत्न बौद्ध विहारात महावंदना व धम्मदेसना समारोह घेण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंद महाथेरो अध्यक्षस्थानी होते.

ठळक मुद्देवैभवनगरातील त्रिरत्न बौद्ध विहारात महावंदना व धम्मदेसना समारोह घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वैभवनगरातील त्रिरत्न बौद्ध विहारात महावंदना व धम्मदेसना समारोह घेण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंद महाथेरो अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले.एकतानगरातील रमाई सांस्कृतिक भवनातील बौद्ध विहारापासून त्रिरत्न बौद्ध विहारापर्यंत रॅली काढण्यात आली. याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला किशोर भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. भिक्खू संघाने धम्मदेसना दिली.धम्मदेसना घेऊन त्याप्रमाणे जीवनात अंमल करा, जेणेकरून जीवनात आपल्याला दु:खावर मात करता येईल, असे भदन्त संघरत्न मानके यांनी यावेळी सांगितले. भदन्त सदानंद महाथेरो, भदन्त विपस्सी महाथेरो, भन्ते बोधी पाली यांच्या धम्मदेसना पार पडल्या. प्रास्ताविक रामदास वीर यांनी तर आभार सुजाता खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दीपक ढोणे, चंद्रशेखर गुजर, कैलास इंगळे, विक्रम रंगारी, विलास कानंदे, विवेक वाघमारे, खोब्रागडे, सुभाष नगराळे, वासनिक, सचिन तलवारे, प्रमोद बारसे आदींनी पुढाकार घेतला.सांस्कृतिक भवन, एकतानगरयवतमाळ : वाघापूर परिसराच्या एकतानगरातील रमाई सांस्कृतिक भवनात वर्षावास समापन समारोह घेण्यात आला. भदन्त शीलरत्न यांनी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले. धम्म ध्वजारोहण, अभिवादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. वर्षा खडसे व चमूचे स्वागतगीत आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त राहुल बोधी होते. अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष महाथेरो भदन्त सदानंदजी यांनी मार्गदर्शन केले. भदन्त शीलरत्न, भदन्त रठ्ठपाल, भदन्त मेधनकर यांच्यासह आर्याजी कल्याणी व वैशाली यांनी धम्मदेसना दिली. फुले-शाहू साहित्य परिषदेचे अध्यक्ष किशोर भगत, वा.श. शिंगाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भीमज्योती चॅरिटेबल ट्रस्ट व धम्मज्योती महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक पायल मनवर यांनी, तर आभार जयश्री सोनोने यांनी मानले.