शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना वितरणचा महा‘शॉक’

By admin | Updated: January 13, 2015 23:05 IST

डिसेंबर महिन्याचे वीज बिल पाहून सर्व सामान्य ग्राहकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. नियमित बिलापेक्षा अधिक बिल आल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसला.

वाढीव दराने बिल : सबसिडी नाकारल्याने ग्राहकांवर थेट ओझेयवतमाळ : डिसेंबर महिन्याचे वीज बिल पाहून सर्व सामान्य ग्राहकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. नियमित बिलापेक्षा अधिक बिल आल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसला. नवीन सरकारने विजेसंदर्भातील सबसिडी नाकारल्याने वाढीव दराचे ओझे थेट ग्राहकांवर पडले असून त्यातून वीज बिलात २० टक्क्याने वाढ झाली आहे. वितरण कंपनीने ग्राहकांना जणू महा‘शॉक’ दिला आहे. दर महिन्याला होणारा रिडींगचा घोळ आणि बिलातील अनंत चुकांमुळे आधीच वीज ग्राहक त्रस्त आहे. त्यातच डिसेंबर महिन्याचे वीज बिल पाहून अनेक जण चक्रावून गेले आहे. नियमित येणाऱ्या वीज बिलापेक्षा अधिक बिल पाहून अनेकांनी आपल्या घरच्या मीटरची पाहणी केली. रिडींग तर बरोबर आहे. मग बिल का जास्त आले याची चौकशी करू लागले. परंतु कुठेच थांगपत्ता लागत नाही. परिणामी अनेकांनी अधिक बिल आले म्हणून कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयाकडे धाव घेतली आहे. वीज वितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव २०१२ मध्ये सूचविला होता. त्यावेळी या वाढीव दराला मंजुरी मिळाली होती. मात्र तत्कालीन राज्य शासनाने ग्राहकांवर भार येऊ नये म्हणून सबसिडीच्या रुपात वीज दरवाढीचा भार उचलला होता. नोव्हेंबर २०१४ पर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नवीन सरकार सत्तारुढ होताच नवीन सरकारने ही सबसिडी नाकारली. परिणामी वीज बिलात सरासरी २० टक्क्याने वाढ झाल्याचे दिसत आहे. सबसिडी काढल्याने वाढीव दराने बिल आले आहे. आधीच विविध भारांसह वीज बिल येत आहे. त्यात आता सबसिडी विरहित बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. (शहर वार्ताहर)