शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची गायिका रमली चिमुकल्यांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:54 IST

रिअ‍ॅलिटी शो जिंकून अवघ्या रसिकांची मनेही जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका अंजली गायकवाड रविवारी यवतमाळात आली होती. रविवारची सुट्टी अन् त्यात अंजलीचे आगमन म्हणजे, यवतमाळच्या बालगोपाळांसाठी सुवर्णसंधी ठरली. ‘सारेगामापा’च्या मंचावर परिपक्व गाणारी अंजलीही समवयस्कांच्या गर्दीत रममाण झाली.

ठळक मुद्देअंजली गायकवाड : अभ्यास कराच, पण कलाही जोपासा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रिअ‍ॅलिटी शो जिंकून अवघ्या रसिकांची मनेही जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका अंजली गायकवाड रविवारी यवतमाळात आली होती. रविवारची सुट्टी अन् त्यात अंजलीचे आगमन म्हणजे, यवतमाळच्या बालगोपाळांसाठी सुवर्णसंधी ठरली. ‘सारेगामापा’च्या मंचावर परिपक्व गाणारी अंजलीही समवयस्कांच्या गर्दीत रममाण झाली. ‘अभ्यास तर केलाच पाहिजे, पण अभ्यासासोबतच एखादी कलाही जरूर जोपासली पाहिजे’ हे तिचे शब्द बालमैत्रिणींना बरेच काही शिकवून गेले.‘सारेगामापा’ची विजेती अंजली गायकवाड हिने शनिवारी वणीत महिला दिना निमित्त गायन केले. त्यानंतर रविवारी ती यवतमाळात आली. अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख प्रा. राहुल एकबोटे यांच्या घरी अंजलीच्या भोवती बच्चेकंपनीचा गोतावळा जमला. या बालमित्रांमध्ये अंजली चेंडू घेऊन मनसोक्त खेळली.यावेळी ‘लोकमत’शी तिने मनमुराद गप्पा केल्या. ती म्हणाली, ‘यवतमाळचे लोकं खूप प्रेमळ आहे. या गावातली भाषा मला खूप आवडते. यवतमाळचा चिवडा प्रसिद्ध आहे. मी आस्वाद घेतला त्याचा.’ गाण्यामुळे महाराष्ट्रच काय, देशभरात ओळख मिळालेली अंजली बोलताना तिचा बालसुलभ निरागसपणा कायम होता. ती म्हणाली, मी तीन चार वर्षाची असतानापासूनच गायला लागली. वडील घरी क्लास घ्यायचे ते ऐकून मलाही शिकता आले.’ कुठल्या प्रकारचे गाणे अधिक आवडते, असे विचारल्यावर अंजली म्हणाली, ‘गाणं कुठलंही चांगलंच. पण शास्त्रीय संगीत अधिक जवळचे. ते आपले मूळ आहे. कार्यक्रमात लोक वेगवेगळ्या गाण्याची फर्माईश करतात, म्हणून चित्रपटातील गाणीही गाते. पण पहिली आवड आहे ते शास्त्रीय संगीतच.’ अवघ्या तेरा वर्षाची अंजली आपल्या करिअरविषयी जागरूक आहे. ती म्हणते, ‘प्रसिद्धी जशी चांगली असते, तसे प्रसिद्धीचे तोटेही असतात. प्रसिद्धीमुळे माझ्यात अनाठायी स्वाभिमान येऊ नये, एवढीच प्रार्थना आहे. पण एक खरे, आपण प्रसिद्ध झालो की आपल्याला प्रत्येक वेळी अपडेट राहावेच लागते.’अंजलीचे वडील अंगद गायकवाड अहमदनगरमध्ये गाणे शिकवितात. ते म्हणाले, अंजली लहान असताना मी तिला निजवताना गाणे म्हणायचो. तेव्हा तिच्या डोळ्यात स्मित असे. ते पाहून मला जाणवले, हिच्या मनात गाणे रुजलेले आहे.