शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : वणी मतदारसंघात सरासरी ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:05 IST

विशेष म्हणजे मतदानासाठी महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३ वाजतानंतर प्रत्येकच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रांगेत उभे राहून मतदार शिस्तीत मतदान करतानाचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पहावयास मिळाले. सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर राजूर व घोन्सा अशा दोन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला.

ठळक मुद्देसर्वाधिक ७५ टक्के मतदान मारेगाव तालुक्यात : वणीत ६७ तर झरी तालुक्यात ७२ टक्के मतदान, अनेक केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी विधानसभा मतदार संघात सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६८ टक्के मतदान झाले. यादरम्यान, अनेक ठिकाणी यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया रखडली. मात्र काही ठिकाणी यंत्रांमध्ये दुरूस्ती करून, तर काही ठिकाणी नवीन यंत्र लावून मतदान घेण्यात आले. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.सोमवारी सकाळपासून या भागात ढगाळ वातावरण होते. हलक्या स्वरूपाचा पाऊसही सुरू झाला. मात्र १० वाजतानंतर ढगाळ वातावरण निवळले. सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीला धिम्यागतीने मतदान झाले. दुपारी १२ वाजतानंतर मतदार हळूहळू मतदानासाठी बाहेर पडू लागले. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. वणी विधानसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२७ टक्के, ११ वाजेपर्यंत १९.३६ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३४.९२ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.८३ टक्के, तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.७५ टक्के मतदान झाले. यात एक लाख ७२ हजार ८८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदानासाठी महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३ वाजतानंतर प्रत्येकच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रांगेत उभे राहून मतदार शिस्तीत मतदान करतानाचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पहावयास मिळाले. सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर राजूर व घोन्सा अशा दोन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला. मात्र यंत्रातील दोष दूर करून पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. यासोबतच वणी शहरातील मोमिनपुरा भागातील ११५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दोनवेळा मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे बराचवेळ मतदान प्रक्रिया खोळंबली होती.वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील ५५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात अचानक बिघाड झाला. सुरूवातीला यंत्रातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यात यश न आल्याने नवे मतदान यंत्र तेथे लावण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजून ३२ मिनीटांनी पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. जवळपास दीड तास मतदारांना मतदान यंत्राची प्रतीक्षा करत मतदान केंद्रावरच थांबावे लागले.वणी शहरातील रजनी मंगेश लुथडे ही महिला तीन दिवसांपूर्वी वणीतील एका खासगी रूग्णालयात प्रसूत झाली. मात्र ती आपल्या चिमुरड्या बाळाला घेऊन यात्रा मैदान परिसरातील मतदान केंद्रावर रूग्णवाहिकेद्वारे पोहोचली व तिने मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान याच मतदान केंद्रावर मतदारांची अचानक गर्दी वाढल्याने चांगलाच गोंधळ उडाला. भिमनगर परिसरातील रहिवासी चंपतराव रामाजी घुमे या ११० वर्षीय वृद्ध मतदारानेदेखील जि.प.सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ६ वाजतानंतर मतदान केंद्राच्या आवारात असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. त्यामुळे ६ वाजतानंतरही मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली.डॉक्टरांच्या घोडेस्वारीने वेधले मतदारांचे लक्षवणीतील डॉ.संकेत अलोणे व डॉ.विकास हेडाऊ यांनी सोमवारी सकाळी घोडेस्वारी करत मतदान केंद्रावर जाऊन मतदारांचे लक्ष वेधले. सर्वप्रथम डॉ.हेडाऊ यांनी न.प.शाळा क्रमांक सहामध्ये मतदान केले, तर डॉ.अलोणे यांनी शाळा क्रमांक पाचमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ