शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

Maharashtra Election 2019 ; सात मतदारसंघ अन् सात तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

२४ ऑक्टोबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सातही विधानसभा क्षेत्रात उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी बॅलेट पेपरची मते मोजली जाणार आहे. यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजणी प्रारंभ होणार आहे. एका वेळी १४ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक : यवतमाळचा निकाल येणार सर्वात शेवटी, एका फेरीला १५ मिनिटे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रातील निकाल सात तासात हाती येणार आहेत. पुसद आणि वणी विधानसभा क्षेत्राचा निकाल सर्वात आधी, तर यवतमाळ विधानसभा क्षेत्राचा निकाल सर्वात शेवटी हाती येणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १४ टेबलवर मतमोजणी होणार असून मोजणीची प्रत्येक फेरी १५ ते २० मिनिटांत आटोपणार आहे.२४ ऑक्टोबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सातही विधानसभा क्षेत्रात उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी बॅलेट पेपरची मते मोजली जाणार आहे. यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजणी प्रारंभ होणार आहे. एका वेळी १४ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायजर, एक सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक, प्रत्येक उमेदवाराचा एक सहायक प्रतिनिधी राहील, असे संपूर्ण नियोजन निवडणूक विभागाने केले आहे. प्रत्येक फेरीचा निकाल फेरीनिहाय जाहीर केला जाणार आहे. त्याकरिता ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतांची ‘टॅली’ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून ५ व्हीव्हीपॅट आणि त्याच मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनची उमेदवारांना पडलेली मते मोजली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी निकाल जाहीर करणार आहेत.सातही क्षेत्रांचे निकाल जिल्हाधिकारी कार्यालयात देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉलमध्ये तशी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.या सात ठिकाणी होणार मतमोजणीवणी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी वरोरा रोडवरील शासकीय गोदामात पार पडणार आहे. राळेगाव विधानसभा क्षेत्राची मतमोजणी राळेगावातील नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्राची मतमोजणी धामणगाव मार्गावरील तंत्रनिकेतनमध्ये पार पडणार आहे. दिग्रस विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी दारव्ह्यातील यवतमाळ रोडवरील शासकीय गोदामात पार पडणार आहे. आर्णी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी पांढरकवड्यातील चालबर्डी रोडवरील बाजार समितीच्या गोदामात पार पडणार आहे. पुसद विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी प्रक्रिया पुसदमधील यशवंत रंगमंदिरातील क्रीडा संकुलात पार पडणार आहे. उमरखेड विधानसभा क्षेत्राची मतमोजणी महागाव रोडवरील शासकीय धान्य गोदामात पार पडणार आहे.मतमोजणीच्या फेऱ्यावणी मतदारसंघ - २३राळेगाव मतदारसंघ - २५यवतमाळ मतदारसंघ - २९दिग्रस मतदारसंघ - २७आर्णी मतदारसंघ - २६पुसद मतदारसंघ - २३उमरखेड मतदारसंघ - २४

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ