शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Maharashtra Election 2019 ; अनुकूल परिस्थितीतही उईकेंना कमी मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

के.एस. वर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वच स्तरावर ...

ठळक मुद्देनिकालानंतरची चर्चा : महाजनादेश यात्रा, कोट्यवधींची कामे तरीही...

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वच स्तरावर खरंच ‘आॅल इज वेल’ विषयी प्रश्नचिन्ह लागले आहे. प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना मिळालेल्या अतिशय कमी मताधिक्याने या प्रश्नाला जन्म दिला आहे. अनेक बाबी अनुकूल असतानाही गत निवडणुकीपेक्षा त्यांच्या मतांची आघाडी ३० हजाराने कमी झाली.राज्यात फडणवीस सरकारची कामगिरी, स्वत: आमदार म्हणून प्रा. उईके यांची कामगिरी आणि आदिवासी विकासमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वत:हून केलेल्या आपल्या प्रतिमेत, व्यवहारात, वागण्यात केलेला बदल, मुख्यमंत्र्यांची या मतदारसंघात आलेली महाजनादेश यात्रा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निघालेली मोठी रॅली आदी बाबी अनुकूल असतानाही अशोक उईके यांना मिळालेले कमी मताधिक्य हीच चर्चा निकालानंतर सर्वत्र सुरू झाली.वास्तविक राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रथमच ना. उईके यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटींची विकास कामे झाली आहेत. पहिली आदिवासी सूतगिरणीस मंजुरात आणून देवधरी येथे भूमिपूजनही करण्यात आले. याशिवाय कर्जमाफी, घरकूल, शौचालय, शेततळे आदींमध्ये अनेकांना शासकीय योजनांचा लाभ दिला गेला. मतदारसंघात येत असलेल्या राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि पांढरकवडा तालुक्याच्या काही भागांसाठी वॉटरकप स्पर्धा सलग दोन-दोन, तीन-तीन वर्षे झाल्या तरी गतवेळी मिळालेली एक लाख मते यावेळी ९० हजारांपर्यंत घटली. ३८ हजारांवरून नऊ हजारांवर आले, असे का घडले हे भाजपच्या स्थानिक व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शोधून त्यानुसार आता बदल करण्याची गरज आहे.वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांना गेली १४ महिन्यांपासून या मतदारसंघात भाजपच्या एका गटाने प्रोजेक्ट केले होते. येथे स्टँडींग उमेदवार उईके असताना मडावी यांना तिकीट मिळणार नव्हतेच. पण, मडावी यांना समोर करून पक्षात दुसरा गट अ‍ॅक्टीव करण्यात आला होता. पक्ष हायकमांडने मडावी आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना नोटीस देण्यापलीकडे कधी काही केले नाही. याच गटाने राळेगाव नगरपंचायतमध्ये वेगळी चूल मांडलेल्या गटास लिफ्ट दिली. नगरपंचायतमध्ये माजलेल्या अनागोंदीचा, असंतुष्ट गटाच्या कारवायांचा फटका उईकेंना थोडाफार बसलाच.भाजप जिल्हाध्यक्ष पदावरून ऐन निवडणुकीच्या काळात राजेंद्र डांगे यांना दूर करण्यात आले. त्यांना राळेगाव मतदारसंघाची निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. येथील जिल्हा भाजप सरचिटणीस अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण यांना वणीची जबाबदारी दिली. यातून वेगळेच संदेश गेले. निवडणूक प्रचार काळात भाजपचे बाभूळगावचे नेते यवतमाळला ठाण मांडून होते. राजकारणात डावपेच, कूटनीती, आॅल राऊंडपणा आदीला अत्यंत महत्त्व आहे. भाजपमध्ये नेमक्या याच गोष्टीचा अभाव होता. त्याचे प्रत्यंतर निवडणूक प्रचार काळात आले. तरंगत्या मतदारांना आकृष्ट करण्याकरिता या काळात एकाही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही, यातून हे स्पष्ट होते. तथापि काही बाबी अनुकूल असताना प्रा.डॉ. अशोक उईके यांना मिळालेली कमी मतांची आघाडी चिंतनीय आहे.निवडणुकीचे राजकारणनिवडणूक विधानसभेची होती. पण यात अनेकांचे कालचे, आजचे व भविष्याचे राजकारण दडलेले होते. त्यामुळे अनेकजण आपापल्या भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे उघड किंवा छुपा पाठिंबा देऊन पाऊले टाकत होते. अनेक मान्यवर विविध बँकेच्या लहान-मोठ्या पदावर आहे. अनेकजण सहकारात पदाधिकारी आहे. त्यातील काहीजण नावाला गावचे, तर प्रत्यक्षात ‘यवतमाळ’चे आहेत. त्यातील प्रत्येकाने आपल्या ‘हिता’च्या दृष्टीने या निवडणुकीत भूमिका बजावली. काहींची भूमिका दुटप्पी होती.