शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Maharashtra Election 2019 ; यवतमाळात हायटेक प्रचारतंत्राचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

अवघ्या १२०० मतांनी शिवसेनेच्या चिन्हावर पराभव पत्करलेले संतोष ढवळे यांनी आता शिवसेना बंडखोर म्हणून दावेदारी केली आहे. आपल्या सामाजिक कार्याचे दाखले देत ते प्रचार मोहीम राबवित आहे. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांनीही मतदारांना भावनिक आवाहन केले आहे.

ठळक मुद्देउमेदवार ट्रोल : सोशल मीडियावर स्थानिक मुद्दे

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयाचा विधानसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात यावा, यासाठी सत्ताधारी व विरोधक सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. मतदारसंघातील तीन लाख ८४ हजार ७७३ मतदारांपैकी ६० टक्के मतदार हा यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात राहणारा आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक तंत्राचा वापर केला जात आहे. प्रत्येकच उमेदवाराने आपले वॉर रूम उघडले असून प्रतिस्पर्ध्याला ट्रोल केले जात आहे.या मतदारसंघात सातत्याने फेरबदल होत आला आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार व पालकमंत्री मदन येरावार यांनी वर्चस्व कायम ठेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. आपली भूमिका विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले. काँग्रेसचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचेही शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व राहिले आहे. आता हा भाग नगरपरिषद क्षेत्रात आल्याने विधानसभा पुन्हा काँग्रेसकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यात हायटेक प्रचार तंत्राचा वापर केला जात आहे.प्रहार जनशक्ती पक्षाकडून पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रात उडी घेतलेले बिपीन चौधरी यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच जाहीर प्रचाराला सुरुवात केली. त्यांचीही नेटकरी फौज विविध मुद्दे, समस्या सोशल मीडियावर ट्रोल करीत आहे.अवघ्या १२०० मतांनी शिवसेनेच्या चिन्हावर पराभव पत्करलेले संतोष ढवळे यांनी आता शिवसेना बंडखोर म्हणून दावेदारी केली आहे. आपल्या सामाजिक कार्याचे दाखले देत ते प्रचार मोहीम राबवित आहे. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांनीही मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड. अमोल बोरखडे, बसपाकडून संदीप देवकते हे उमेदवारही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे.८० चौरस किलोमीटर परिघावर फोकसयवतमाळ शहराच्या नगरपरिषद विस्तारानंतर येथील लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्र वाढले आहे. त्यामुळेच यवतमाळातील समस्या, विकास कामे या भोवतीच येथील निवडणूक व प्रचार यंत्रणा केंद्रीत झाली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत सर्वच उमेदवारांकडून यवतमाळातील समस्या, येथील प्रस्तावित कामे यावरच उहापोह केला जात आहे. हेच मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून सचित्र व्हायरल होत आहे. सध्या तरी व्हॉटस्अ‍ॅप, इन्ट्राग्राम, फेसबुक यावरील ग्रुपमध्ये उमेदवाराला ट्रोल करून चर्चांचे फड रंगत आहे.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ