शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; उमेदवारांचा दसरा, आमदारांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

अविनाश साबापुरे। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मतदारांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असलेले दिवाळी, दसरा ऑक्टोबरमध्येच. तर मतदारांच्या आयुष्याला कलाटणी ...

ठळक मुद्देआज कुणाची माघार ? : विजयादशमीपूर्वीच प्रचाराच्या ‘सोन्या’ची खैरात, दिवाळीपूर्वीच ‘लक्ष्मीपूजना’ची शक्यता

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मतदारांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असलेले दिवाळी, दसरा ऑक्टोबरमध्येच. तर मतदारांच्या आयुष्याला कलाटणी देणारी विधानसभा निवडणूकही याच महिन्यात. जिल्ह्यातील सातही मतदारसंघासाठी शे-सव्वाशे इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नेमके किती उमेदवार रिंगणात उरणार हे ठरणार आहे. तर दिवाळीच्या दोन दिवसाआधी सात आमदारांचा फैसला होणार आहे.यवतमाळ, वणी, राळेगाव, आर्णी, पुसद, उमरखेड, दिग्रस या सातही मतदारसंघातील गावागावांत सध्या दसरा-दिवाळीपेक्षाही जास्त निवडणुकीची चर्चा आहे. दसरा आणि दिवाळीच्या धामधुमीतच २१ ऑक्टोबरला मतदान आहे. दसऱ्याच्या निमित्ताने लोक वैर विसरुन एकमेकांची गळाभेट घेतात. मात्र यंदा ऐन दसऱ्यातही भाजप-सेनेच्या युतीचा एकोपा टिकणार की नाही, मित्र पक्षाच्याच उमेदवारापुढे बंडखोरीचे आव्हान संकट निर्माण करेल का यावर खलबते झडत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मैत्रीचा खरेपणाही कितपत खरा असावा याची चर्चा सामान्य मतदारात रंगत आहे.दसऱ्याच्या आदल्यादिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना प्रेमाने भेटून सर्वसामान्य मतदार दुसऱ्या दिवशी दैनंदिन जीवनात व्यस्त होणार असले तरी उमेदवारांना मात्र दसऱ्यापासून सुरू केलेला आपुलकीचा ‘व्यवहार’ दिवाळीपर्यंत दररोज कायम ठेवावा लागणार आहे. आश्वासनांचे सोने वाटतच रहावे लागणार आहे. यात मतदार ज्यांना मतांचे ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, तेच आमदार होणार आहे. दरम्यान दिवाळीचा दिवस उजाडण्यापूर्वीच अनेक गावांमध्ये ‘लक्ष्मीपूजन’ होण्याचीही शक्यता आहे. आता दसऱ्यापासून प्रचाराचे सोने वाटल्यानंतर दिवाळीत कुणाचे फटाके फुटणार आणि कुणाचा बॅन्ड वाजणार याचा फैसला २४ ऑक्टोबरच्या मतमोजणीतच होणार आहे.उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, शिक्षकांचा भरणाजिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातून यावेळी सव्वाशे इच्छुकांनी नामांकन भरले आहे. यात व्यवसायाने डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक असलेल्या उमेदवारांची मोठी संख्या आहे. राजकारणात अल्पशिक्षित लोकांचाच भरणा असल्याची सतत ओरड होत असते. मात्र यावेळेसच्या निवडणुकीत उच्चशिक्षित उमेदवारांनी हा समज खोटा ठरविला आहे. विशेष म्हणजे हे उच्चशिक्षित उमेदवारही अपक्ष नसून विविध राजकीय पक्षांनी उभे केलेले आहे, ही दिलासादायक बाब. राळेगाव मतदारसंघात डॉ. अशोक उईके हे एमएस्सी, पीएचडी झालेले आहेत. तर प्रा. वसंत पुरके हेही एमए, एचडीएड आहेत. याच मतदारसंघात माधव कोहळे बीएड, डीएड आहेत. यवतमाळ मतदारसंघातही अ‍ॅड. अमोल बोरखडे बीएस्सी, एलएलबी, मदन येरावार डीफार्म आहेत. अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर, संतोष ढवळे, योगेश पारवेकर बारावी उत्तीर्ण आहेत. या मतदारसंघात अशोक काळमोरे हे सर्वात कमी म्हणजे तिसरीपर्यंत शिक्षण झालेले उमेदवार आहे. वणी मतदारसंघात एमबीबीएस, डीजीओ, सीपीएस झालेले डॉ. महेंद्र लोढा, बीएस्सी बीएड झालेले विश्वास नांदेकर हे उच्चशिक्षित उमेदवार आहेत. तर वामनराव कासावार, संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी बीए केले आहे. राजू उंबरकर यांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. दिग्रस मतदारसंघात एमकॉम, एमफील, बीएड, पीएचडी झालेले अजय दुबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. येथे संजय राठोड बीकॉम, बीपीएड तर संजय देशमुख बीकॉम, मो.तारिक मो. सामी अकरावीपर्यंत शिकलेले आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. शिवाजीराव मोघे एमकॉम, एलएलबी तर डॉ. संदीप धुर्वे एमबीबीएस, प्रा. राजू तोडसाम एमए, बीएड झालेले आहेत. शिवाय अपक्ष उमेदवार नयना ठाकूर यांनी बीएबीएड, बीकॉम पूर्ण केले असून एलएलबीच्या तिसºया वर्षाचे त्यांचे शिक्षण सुरू आहे. पुसद मतदारसंघातही इंद्रनील नाईक, नीलय नाईक एलएलबीपर्यंत शिकलेले आहे. तर सविता अधव यांनीही एमए, एमएड केले आहे. उमरखेड मतदारसंघात हरिश पाचकोरे एमए, एमफील, बीएड तर डॉ. विश्वनाथ विणकरे एमबीबीएस, एमएस, डॉ. प्रमोद दुथडे एमडीपर्यंतचे (मेडिसीन) शिक्षण घेणारे उच्चशिक्षित उमेदवार आहे. नामदेव ससाने यांनी एमए केले असून विजयराव खडसे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे.एकीकडे प्रमुख उमेदवारांमध्ये अनेक उच्चशिक्षितांचा भरणा असला तरी उर्वरित जवळपास शंभर उमेदवारांमध्ये केवळ पदवीपर्यंत शिक्षण झालेल्यांची मोठी संख्या आहे. त्यातही अनेक जण दहावी-बारावीपर्यंतच शिक्षण घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. आश्चर्य म्हणजे अनेकांनी दहावीपर्यंतही मजल मारलेली नाही. तिसरी, सातवी, नववी उत्तीर्ण होऊन सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ