शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Maharashtra Election 2019 ; बंडखोरांच्या माघारीसाठी युतीत ‘सशर्त’ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:21 IST

दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसेनेपुढे खरी डोकेदुखी ठरली ती माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची बंडखोरी.

ठळक मुद्देसंडे अँकर । दिग्रसमध्ये भाजपची माघार असेल तरच यवतमाळ, उमरखेड, आर्णी, वणीत शिवसेनेचा ‘विड्रॉल’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असली तरी पाच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांच्या भूमिकेवर युतीच्या उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. तुम्ही दिग्रसमध्ये माघार घ्याल तरच आम्ही यवतमाळ, आर्णी, वणी व उमरखेड विधानसभा मतदारसंघात माघार घेऊ असा सशर्त प्रस्ताव शिवसेनेने भाजपकडे ठेवल्याची माहिती आहे.दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसेनेपुढे खरी डोकेदुखी ठरली ती माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची बंडखोरी. देशमुख रिंगणात असल्यास युतीला मिळणाऱ्या मतांचे विभाजन निश्चित आहे. देशमुख यांनीही शिवसेनेच्याच बरोबरीने नामांकनाच्या वेळी शक्तीप्रदर्शन करताना गर्दी जमविली होती. या गर्दीने शिवसैनिकांच्या हृदयाचे ठोके वाढविले आहे. मतदारसंघातील राजकारण देशमुखांच्या भोवती केंद्रीत होण्याचे व राठोड विरोधकांची त्यांना साथ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संजय राठोड यांनी आधी भाजप बंडखोर संजय देशमुख यांची उमेदवारी मागे घ्या असा जोरदार आग्रह जिल्हा व राज्याच्या भाजप श्रेष्ठींपुढे ठेवला आहे. देशमुखांनी माघार घेतली तरच शिवसेनेतील बंडखोरी मागे घेता येईल, असा तडजोडीचा प्रस्ताव ठेवला गेला. वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, सुनील कातकडे, आर्णीत नयना शैलेश ठाकूर, अमोल मंगाम, यवतमाळ मतदारसंघात संपर्क प्रमुख संतोष ढवळे, नगरसेवक गजानन इंगोले तर उमरखेड मतदारसंघात डॉ. विश्वनाथ विणकरे, निर्मला विणकरे यांनी बंडखोरी केली. या बंडखोरांमुळे भाजपच्या चार जागा वांद्यात येऊ शकतात. त्या तुलनेत सेनेला एकाच जागेवर आणि तेही मतांची आघाडी कमी होण्यापुरतेच नुकसान होऊ शकते, असा राजकीय अंदाज आहे.शिवसेनेचा प्रस्ताव असला तरी भाजप व सेनेतील बंडखोर खरोखरच माघार घेतील का, याबाबत साशंकता आहे. कारण संजय देशमुख भाजप बंडखोर मानले जात असले तरी त्यांनी अपक्ष राहून पर्यायी आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न चालविला होता. त्यामुळे त्यांनी भाजप सोडल्यात जमा असल्याचे मानले जाते. पर्यायाने भाजप श्रेष्ठींचे ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच ते रिंगणात कायम राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे. अशीच स्थिती यवतमाळ, आर्णी व उमरखेड मतदारसंघात आहे. संतोष ढवळे, नयना ठाकूर, विश्वनाथ विणकरे यांचा निर्धार पक्का असल्याने ते माघार घेण्याची चिन्हे नाहीत. सेनेतील या असंतुष्टांना मुंबईतून मूकसंमती तर नाही ना अशीही शंका व्यक्त होते.एक लाख मतांच्या आघाडीचे काय ?दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २०१४ च्या निवडणुकीत राज्यात दुसºया क्रमांकाची सर्वाधिक ८० हजार मतांची आघाडी घेतली होती. पहिल्या क्रमांकाची आघाडी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत संजय राठोड यांनी मतांची ही आघाडी एक लाखांवर नेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. परंतु भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या उमेदवारीने राठोड यांचे स्वप्न भंगणार तर नाही ना याची हूरहूर पहायला मिळते.वणीत सेनेची बंडखोरी भाजपच्या फायद्याचीजिल्ह्यात पुसद व राळेगाव वगळता पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी आहे. या बंडखोरांना बसविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. ही बंडखोरी पक्षाच्या उमेदवारासाठी कशी नुकसानकारक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न अधिकृत उमेदवारांकडून श्रेष्ठींकडे केला जात असताना वणी मतदारसंघ मात्र याला अपवाद ठरला आहे. तेथे शिवसेनेचे विश्वास नांदेकर व सुनील कातकडे यांनी युतीत असतानाही केलेली बंडखोरी भाजपसाठी फलदायी ठरणार असल्याचा भाजप उमेदवाराच्या समर्थकांचा युक्तीवाद आहे.

टॅग्स :digras-acदिग्रासYavatmalयवतमाळ