शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Maharashtra Election 2019 ; १२७ उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात मोठी गर्दी पहायला मिळाली. सर्व प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या दिवशीच नामांकन दाखल करण्यास पसंती दर्शविली. बहुतांश उमेदवारांनी वाजतगाजत मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. वणी, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ, आर्णी या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी पहायला मिळाली.

ठळक मुद्देसात विधानसभा मतदारसंघ : भाजप, शिवसेनेत बंडखोरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सात विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी अखेरच्या दिवशीपर्यंत एकूण १२७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यात बंडखोर व अपक्षांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक २३ उमेदवारांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आर्णीत भाजप आमदार राजू तोडसाम यांची बंडखोरी चर्चेचा विषय ठरली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात मोठी गर्दी पहायला मिळाली. सर्व प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या दिवशीच नामांकन दाखल करण्यास पसंती दर्शविली. बहुतांश उमेदवारांनी वाजतगाजत मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. वणी, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ, आर्णी या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी पहायला मिळाली. उमरखेडमध्ये मात्र भाजप आमदाराचे तिकीट कापल्याने बंडखोरी होईल हा अंदाज खोटा ठरला. शुक्रवारी अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा समावेश आहे. उमेदवारी दाखल करताना युती व आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. काही ठिकाणी एबी फॉर्मचा घोळ झाला. यवतमाळ मतदारसंघासाठी एमआयएमकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराला औरंगाबादपर्यंत जाऊनही एबी फॉर्म मिळाला नाही. तर वणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर डॉ. महेंद्र लोढा यांनी वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म जोडला. कालपर्यंत भाजपमध्ये असल्याचे सांगून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याच्या बळावर अपक्ष रिंगणात उतरण्याचे नियोजन असलेल्या संजय देशमुख यांना तारिक लोखंडवाला यांच्या उमेदवारीने धक्का दिला गेला. आता देशमुख अपक्ष रिंगणात उतरले आहे. शिवसेनेत एकाच वेळी चार मतदारसंघात झालेली बंडखोरी पाहता हे इच्छुक जिल्ह्याच्या एकाच जागेवर समाधान मानणाºया शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याचे स्पष्ट होते.विधानसभानिहाय संख्या व प्रमुख उमेदवारयवतमाळ मतदारसंघ - एकूण १५ उमेदवार : मदन येरावार भाजप, बाळासाहेब मांगुळकर काँग्रेस, संतोष ढवळे शिवसेना बंडखोर, गजानन इंगोले शिवसेना बंडखोर, बिपीन चौधरी प्रहार, योगेश पारवेकर वंचित बहुजन आघाडी, अ‍ॅड. अमोल बोरखडे विदर्भ राज्य आघाडी आदी.पुसद मतदारसंघ - एकूण १९ उमेदवार : अ‍ॅड. नीलय नाईक भाजप, इंद्रनील नाईक राष्टÑवादी काँग्रेस, अभय गडम मनसे, ज्ञानेश्वर बेले वंचित बहुजन आघाडी, सविता अधव बसपा आदी.दिग्रस मतदारसंघ - एकूण १५ उमेदवार : संजय राठोड शिवसेना, मो. तारिक मो. समी राष्टÑवादी काँग्रेस, संजय देशमुख भाजप बंडखोर, अजय दुबे भाजप बंडखोर, शहेजाद समीउल्ला खा वंचित आघाडी, एजाज नवाज खॉ बसपा आदी.राळेगाव मतदारसंघ - एकूण २० उमेदवार : प्राचार्य डॉ. अशोक उईके भाजप, प्रा. वसंत पुरके काँग्रेस, गुलाब पंधरे प्रहार, माधव कोहळे वंचित आघाडी आदी.आर्णी मतदारसंघ - एकूण १५ उमेदवार : अ‍ॅड. शिवाजीराव मोघे काँग्रेस, डॉ. संदीप धुर्वे भाजप, प्रा. राजू तोडसाम भाजप बंडखोर, नयना ठाकूर शिवसेना बंडखोर, अ‍ॅड. अनिल किनाके बहुजन मुक्ती पार्टी, निरंजन मसराम वंचित आघाडी, मारोती आत्राम गोंडवाना गणतंत्र पार्टी, दत्तात्रय सिडाम, अमोल मंगाम शिवसेना बंडखोर, बळीराम नेवारे बसपा आदी.वणी मतदारसंघ - एकूण २० उमेदवार : संजीवरेड्डी बोदकुरवार भाजप, वामनराव कासावार काँग्रेस, राजू उंबरकर मनसे, डॉ. महेंद्र लोढा वंचित आघाडी, संजय देरकर अपक्ष, विश्वास नांदेकर शिवसेना बंडखोर, सुनील कातकडे शिवसेना बंडखोर, अजय धोबे संभाजी ब्रिगेड, प्रवीण खानझोडे बसपा, अनिल घाटे भाकप, संतोष भादीकर बसपा आदी.उमरखेड मतदारसंघ - एकूण २३ उमेदवार : विजय खडसे काँग्रेस, नामदेव ससाने भाजप, डॉ. विश्वनाथ विणकरे शिवसेना बंडखोर, प्रमोद दुथडे वंचित आघाडी, कैलास वानखडे मनसे.५ ऑक्टोबर : नामांकन अर्ज छाननी.७ ऑक्टोबर:अर्ज मागे घेण्याची मुदत.२१ ऑक्टोबर : मतदान२४ ऑक्टोबर : मतमोजणी

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ