शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महागावच्या बिबट बछड्याचा नागपुरात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:30 IST

पाण्याच्या शोधात भरकटलेल्या दुसऱ्याही बिबट बछड्याचा नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात मृत्यू झाला. तर बछड्यांच्या शोधात मादी बिबटाचा तालुक्याच्या वाकान परिसरात हैदोस सुरू आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमादी बिबटाचा हैदोस : वन्यजीव बचाव केंद्रात सुरू होते उपचार

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पाण्याच्या शोधात भरकटलेल्या दुसऱ्याही बिबट बछड्याचा नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात मृत्यू झाला. तर बछड्यांच्या शोधात मादी बिबटाचा तालुक्याच्या वाकान परिसरात हैदोस सुरू आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महागाव तालुक्यातील वाकान शिवारात संतोष राठोड यांच्या शेतात १३ एप्रिल रोजी मादी बिबटासह दोन नवजात बछड्यांचे दर्शन नागरिकांना झाले होते. तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने घाबरून जावून मादी बिबट्याने दोन नवजात बिबटांना सोडून पलायन केले. याची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली. त्यावेळी एक नवजात बछडा मृतावस्थेत आढळून आले. तर जिवंत बछड्याला वन विभागाला ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार करण्यात आले. तीन दिवस शेतातच त्याला ठेवून मादी बिबट येण्याची प्रतीक्षा करण्यात आली. परंतु मादी बिबट आलीच नाही. त्यामुळे या बछड्याला नागपूर येथील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे या बछड्याला पाठवून उपचार सुरू झाले. तेथे सुहास असे नामकरणही करण्यात आले. परंतु त्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ.चेतन राठोड व डॉ.बिलाल यांनी निरीक्षण नोंदविले.दरम्यान, पिलापासून विभक्त झालेली मादी बिबट चांगलीच चवताळली आहे. आपल्या पिलांच्या शोधात ती सैरभैर भटकंती करीत आहे. रात्री-बेरात्री अनेकांना तिचे दर्शन झाले. रविवारी रात्री वाकान येथील अनिल पवार यांचा गोरा ठार मारला. या मादी बिबटाच्या हैदोसाने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.उच्चस्तरीय चौकशीची मागणीवाकान शिवारात जिवंत आढळलेल्या दोन बिबटांच्या मृत्यूला वन विभागाचेच अधिकारी कारणीभूत असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमी प्रमोद भरवाडे यांनी केली आहे. वन विभागाला सकाळी माहिती दिल्यानंतरही दगडात फसलेल्या पिलावर उपचार करण्यासाठी डॉक्टर सायंकाळी पोहोचले. अधिनस्थ कर्मचाºयांनीही योग्य खबरदारी घेतली नाही. त्यामुळेच या दोन वन्यजीवांचा प्राण गेला, असा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Tigerवाघ