शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

यंदा विमानवारीची हॅट्रिक... ‘महादीप’मधून ४१ जणांची भरारी

By अविनाश साबापुरे | Updated: March 18, 2024 17:40 IST

खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी सिद्ध केली गुणवत्ता, गावाने काढली मिरवणूक

यवतमाळ : खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लावण्यासोबतच त्यांना विमानवारी घडविणारी महादीप परीक्षा यंदाही जिल्ह्यात पार पडली. जिल्ह्यातील.... हजार विद्यार्थ्यांना चार स्तरावरील सात परीक्षांच्या फेऱ्यातून जोखून घेतल्यानंतर ४१ गुणवंतांची विमानवारीसाठी निवड करण्यात आली आहे. सोमवारी सीईओंच्या मान्यतेनंतर ही यादी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, महादीप परीक्षेनंतर होणाऱ्या विमानवारीचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

राज्यात एकमेव ठरलेला महादीप परीक्षेचा उपक्रम यवतमाळ जिल्हा परिषदेने तीन वर्षांपासून सुरू केला आहे. यंदाही इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक सत्रात तयारी करवून घेण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबरपासून या परीक्षेच्या फेऱ्या सुरू झाल्या. आधी शाळास्तरावर, नंतर केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची छाननी करत तालुकास्तरावर तीन फेऱ्या घेण्यात आल्या. त्यातून जिल्हास्तरीय अंतिम परीक्षेसाठी ६१२ विद्यार्थी पात्र ठरले होते. मार्च महिन्याच्या प्रारंभी ही ५० गुणांची वस्तूनिष्ठ प्रश्नांची जिल्हास्तरीय परीक्षा पार पडली. त्यातून ४१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. आता जिल्हा परिषदेच्या वतीने लवकरच या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच विमानवारीचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वीच गावकऱ्यांनी आपल्या गावातील विजेत्या विद्यार्थ्यांची कुठे बैलगाडीतून तर कुठे मोटारगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढून आनंद साजरा केला आहे.

हे विद्यार्थी ठरले पात्रपाचवा वर्ग : वृशाली मधुकर मून (लोणी ४०), सक्षम संतोष वाढवे (तरोडा ३७), आर्यन जी. शेंडे (मानोली ३६), श्रावणी सी. कुमरे (किन्ही ३६), भावेश रवींद्र माहुरे (चिकणी ३६), इशांत संदीप दरणे (सुकळी ३५), आयुष मनोज गोगटे (चिकणी ३५), असद खान जमीर खान (मुळावा ३७).

सहावा वर्ग : कुलदीप प्रमोद लांडे (लोहारा ४४), विठ्ठल रावसाहेब आंभोरे (वाणेगाव ४३), ज्ञानेश्वरी पी. खंडाळकर (तिवसाळा ४३), सानवी बद्रीनाथ सगमे (विडूळ ४२), राधिका जे. देवळे (किन्ही ४०), नंदिनी प. ढवळे (दहेगाव ४०), अंकिता सतीश शिंदे (नागेशवाडी ४०), सम्यक सुमेश जामनिक (लोहारा ३९), संध्या पी. राठोड (तिवसाळा ३९), मिस्बा अश्फाक खान (बोरी अरब ४०).

सातवा वर्ग : प्रतिक ओम विकास भोरे (उमरखेड ४३), तनुष्का वेणूशाम बाभळे (कोसारा ४२), खुशी आर. जाधव (किन्ही ४२), राशी अविनाश कुंटे (विडूळ ४०), क्रांती एस. भंडारवार (पिंपरी ४०), अमृता रोंगे (लोहारा ३९), किरण मनोज जाधव (पोखरी ३९), स्नेहल जी. शेंडे (मानोली ३९), पलक एम. शेलूकार (तिवसाळा ३८), प्रेम रितेश मंगरे (लोहारा ३८), अश्मीरा सैय्यद इर्शाद (बोरी अरब ३४), अरसनाल खान अजमत खान (लाडखेड ३४).

आठवा वर्ग : सोहम डी. कोटनाके (झटाळा ४६), सानिया श्रीकृष्ण परोपटे (राणी अमरावती ४६), समीक्षा जी. भुरे (किन्ही ४६), कौतुक युवराज चव्हाण (कासाेळा ४४), जान्हवी जी. सावरकर (किन्ही ४४), श्रवण एम. अडकिने (तिवसाळा ४१), सोहम खंडाळकर (तिवसाळा ४०), इश्वरी मारोती वानखेडे (धानोरा ४०), रोशनी राजू राठोड (वसंतपूर ३८), अनुष्का प्रमोद उईके (राणी अमरावती ३८), शेख मावान शेख इरफान (ढाणकी ४२).

विमानवारीसाठी तीन शहरांचा प्रस्तावयंदा महादीपमधील विजेत्या विद्यार्थ्यांची विमानवारी कुठे न्यावी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या स्तरावर ठिकाणाची निश्चिती होणार आहे. मागील वर्षी चंडीगडची सहल झाली होती. यंदा म्हैसूर, बंगळूर, हैदराबाद या ठिकाणांचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत अंतिम मान्यता अद्याप मिळायची आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी या उपक्रमाची पायाभरणी केली होती. तर विद्यमान सीईओ मंदार पत्की, शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी पाठबळ दिले आहे. विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे समन्वयक आहेत. 

घाटंजी तालुक्याने यंदाही पटकावला अव्वल क्रमांकगेल्या दाेन वर्षातील महादीप परीक्षेत घाटंजी तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थी विमानवारीस पात्र ठरले. यंदाही जिल्ह्यातून पात्र ठरलेल्या ४१ पैकी तब्बल १५ विद्यार्थी घाटंजी तालुक्यातीलच आहेत. त्यानंतर उमरखेडमधून ९, यवतमाळ ४, दारव्हा ३, बाभूळगाव २, महागाव २, नेर २, तर राळेगाव, कळंब, मारेगाव, पुसद या तालुक्यातून प्रत्येकी एक विद्यार्थी विमानवारीला पात्र ठरला आहे.

पात्र ठरलेले विद्यार्थीमराठी : ३६उर्दू : ०५मुली : २४मुले : १७