शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’च्या अध्यक्षपदी माधवराव माने

By admin | Updated: June 15, 2017 01:02 IST

विदर्भातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी

बिनविरोध निवड : कारखान्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचा झेंडा लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : विदर्भातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपाच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.माधवराव माने यांची बुधवारी अविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वपक्षीय संचालकांच्या सहकार्याने भाजपाचा झेंडा फडकला. वसंतचे तत्कालिन अध्यक्ष हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त होते. बुधवारी दुपारी १ वाजता उमरखेडचे सहायक निबंधक सुनील भालेराव यांच्या अध्यक्षतेत कारखान्याच्या अध्यक्षाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव सवनेकर यांनी माने यांचे नाव सुचविले. तर राष्ट्रवादीचे रमेश चौधरी यांनी अनुमोदन दिले. ठरल्यानुसार सर्वपक्षीय संचालकांच्या सहकार्याने माने यांची निवड झाली. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष माधवराव पाटील जवळगावकर अनुपस्थित होते. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव कान्हेकर, विनोद जिल्लेवार, धनंजय अत्रे, महेश नाईक, कारखान्याचे उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर, संचालक कल्याणराव माने, सुभाष जाधव, नानाराव चव्हाण, राजू मोतेवार, रमन रावते, चितांगराव कदम, विलास मोरे, रेखा वानखेडे, कमलाबाई नाईक यांच्यासह माजी कुलगुरू शेषराव सूर्यवंशी, ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष तातेराव चव्हाण, विजयराव जाधव, रामराव नरवाडे, ब.मो. शर्मा, अ‍ॅड.आदित्य माने उपस्थित होते. अतिशय विपरीत परिस्थितीत कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा संचालकांनी माझ्या खांद्यावर सोपविली. भविष्यात कारखान्याच्यासमोर अडचणीचे डोंगर उभे राहू शकतात. परंतु सर्वांच्या सकारात्मक भूमिकेतून कारखान्याची घडी बसविणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष माधवराव माने यांनी यावेळी सांगितले. कारखान्याचा गळीत हंगाम वेळेवरच सुरू करणार असल्योचही त्यांनी सांगितले.