शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पाच वर्षांत सर्वात कमी पाऊस

By admin | Updated: July 23, 2014 23:51 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृग नक्षत्रास दीड महिना उलटूनदेखील पावसाच्या सरासरीने शंभरीसुद्धा गाठली नाही. जिल्ह्यात आघाडीवर राहणारा पुसद तालुका पावसाच्या बाबतीत सर्वात मागे पडला

नदी-नाले कोरडे : पावसाने सरासरी शंभरीही गाठली नाहीअखिलेश अग्रवाल - पुसद गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृग नक्षत्रास दीड महिना उलटूनदेखील पावसाच्या सरासरीने शंभरीसुद्धा गाठली नाही. जिल्ह्यात आघाडीवर राहणारा पुसद तालुका पावसाच्या बाबतीत सर्वात मागे पडला असून गेल्या पाच वर्षात प्रथमच पावसाने नीच्चांक गाठला आहे. तालुक्यातील नदी-नाले कोरडे असून प्रकल्पातही जलसंचय वाढला नाही.पुसद तालुक्यात दीड महिन्याच्या खंडानंतर १९ जुलैपासून पावसाची रिमझीम सुरू आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यातील दिवसांपैकी तालुक्यात सरासरी १५ दिवस व ८१५ मिमी पावसाची सरासरी असते. यावर्षी यातील दीड महिन्याच्या कालावधी कोरडा गेला आहे. यातही पडलेल्या पाऊस पर्जन्यमापकामध्ये नोंदला गेला असला तरी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्यामुळे केवळ आजच्या २२ जुलैपर्यंत केवळ ५६ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या पाच वर्षात वार्षिक सरासरी ओलांडली नाही, असे झाले नाही. पावसाची अवकृपा कधीही झाली नसल्याने उत्पादनाच्या बाबतीत पुसद तालुका नेहमीच आघाडीवर असतो.गेल्या पाच वर्षाची पावसाची आकडेवारी बघितली तर २०१० मध्ये १६ जून रोजी पावसाला सुरुवात झाली होती. १ जुलैपर्यंत १४१ मिमी पाऊस झाला होता. १ जुलै रोजी पूस नदीला पूर आला होता. २०११ मध्ये १४ जूनला पावसाला सुरुवात होऊन २६ जूनपर्यंत १०९ मिमी पाऊस झाला होता. २० जुलैपर्यंत ३०४ मिमी पाऊस झाला होता. २०१२ मध्ये १० जून रोजी मृगाचा पाऊस बरसला. १८ जूनपर्यंत १८८ मिमी पावसाची नोंद झाली. २०१३ रोजी ६ जून रोजी मृगाचा पाऊस झाला. १४ जून रोजी पूस धरण ओव्हर-फ्लो झाले होते. १६ जुलैपर्यंत ४६१ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी २०१४ मध्ये ८ जुलै रोजी दमदार पाऊस झाला पण आज २२ जुलैपर्यंत केवळ ५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाच वर्षात प्रथमच जुलै महिना संपत आला असताना पावसाने शंभरी गाठली नाही. दरम्यान, चार वर्षात वरूण राजाने कधीही नाराज केले नाही. विशेष म्हणजे चार वर्षात मृग नक्षत्रातच पावसाचे आगमन झाले होते. गतवर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पाऊस झाला होता. १४ जून रोजी पूस धरण ओव्हर-फ्लो झाले होते. गेल्या १९९२ ते २०१३ या २१ वर्षात १७ वेळा पूस धरण ओव्हर-फ्लो झाले आहे. अधिक वेळा म्हणजे ११ वेळा धरण आॅगस्ट महिन्यातच ओव्हर-फ्लो झाले. जुलै महिन्यात धरण दोन वेळा ओव्हर-फ्लो झाले.गतवर्षी पावसाच्या पहिल्या आठवड्यात नदी-नाले-ओढे एक झाले होते. यंदा गतवर्षीच्या उलट स्थिती आहे. पावसाच्या आगमनासाठी प्रार्थना करावी लागली. आता चार दिवसांपासून पावसाला प्रारंभ झाला. मात्र तो रिमझीम स्वरूपाचा आहे. चार दिवसांपासून झडी असताना नदी-नाले कोरडेच दिसत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.