शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

राळेगावात कमी दाबाची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

यासंदर्भात विद्युत कंपनीचे येथील उपकार्यकारी अभियंता म्हणाले, यवतमाळ-राळेगाव मार्गातील वीज वाहिनीत अनेक ठिकाणी इतरत्रही वीज दिली जात आहे. कळंब, कोठा येथे वीज पुरवठा केला जातो. राळेगावनंतर झाडगाव, वाढोणापर्यंतही एकाच वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होतो. ठिकठिकाणी तुकडे पडत असल्याने त्याचा परिणाम वीज दाबावर होत आहे.

ठळक मुद्देउपकरणे बंद : वीज जाण्याचे प्रमाणही वाढले, नागरिकांना उकाड्यात काढावे लागताहेत दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शहरातील अनेक भागात कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. यामुळे महागडी वीज उपकरणे पूर्ण क्षमतेने काम करत नाही. अनेक ठिकाणी पाण्याच्या मोटारी पाणी ओढू शकत नाही. कुलर, पंखे वेग घेत नाही. जादा वॅटच्या बल्बचा प्रकाश परिपूर्ण उजेड देत नाही. काहींची वीज उपकरणे बंद पडणे, निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे.नगरपंचायतीच्या कळमनेर येथील एक्सप्रेस फिडरला सतत व पूर्ण दाबाची वीज मिळत नसल्याने त्याचा परिणाम येथील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. वडकीसह ग्रामीण भागात याचे प्रमाण वाढले आहे. कधी वीज बंद, कधी वीज फेल यामुळे बँक ग्राहकांना भर उन्हाळ्यात तासन् तास नंबरच्या प्रतीक्षेत घालविण्याच्या घटना या महिन्यात अनेकदा घडल्या आहे.यासंदर्भात विद्युत कंपनीचे येथील उपकार्यकारी अभियंता म्हणाले, यवतमाळ-राळेगाव मार्गातील वीज वाहिनीत अनेक ठिकाणी इतरत्रही वीज दिली जात आहे. कळंब, कोठा येथे वीज पुरवठा केला जातो. राळेगावनंतर झाडगाव, वाढोणापर्यंतही एकाच वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होतो. ठिकठिकाणी तुकडे पडत असल्याने त्याचा परिणाम वीज दाबावर होत आहे. यवतमाळ ते राळेगाव सरळ वीज पुरवठा असता किंवा १३२ केव्ही स्टेशन पूर्णत्वास येवून कार्यान्वित झाले असते तर वीज ग्राहकांकरिता सुविधेचे झाले असते, असे ते म्हणाले.१३२ केव्ही उपकेंद्र अपूर्णसन २०१८ च्या डिसेंबरमध्ये बरडगाव येथील १३२ केव्ही सबस्टेशन पूर्णत्वास जावून या भागातील नागरिकांच्या वीज तुटवड्याची परिपूर्ण गरज भागविली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. सुरुवातीला नाशिकच्या ठेकेदाराने या सबस्टेशनच्या उभारणीत कालापव्यय केला, हलगर्जी केली. त्यानंतर हे सबस्टेशन वीज विभागाद्वारे चार्जींगकरिताही धिम्या गतीने कार्य करीत राहिले. २५ मे रोजी संपूर्ण कामे आटोपून लोकार्पणाची प्रतीक्षा असताना असता लॉकडाऊनमुळे विलंब लागणार असे सांगण्यात येत आहे. जून अखेरपर्यंतही पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यावर्षीसुद्धा नागरिकांना दरवर्षीप्रमाणे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. १५० कोटी रुपये खर्चाचे हे सबस्टेशनच लपंडाव करीत आहे.

टॅग्स :electricityवीज