शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरात प्रेमप्रकरणातून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

शिवाजी वार्डातील एका विवाहितेसोबत शेख अख्तरचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. अख्तर हासुद्धा विवाहित असून त्याला दोन अपत्य आहे. प्रेयसी माहेरी आली असल्याचे समजताच शेख अख्तरने सोमवारी रात्री तिच्या घरासमोर जाऊन रिव्हॉल्वरमधून जमिनीवर एक राऊंड फायर केला. पतीसोबत फारकत घेऊन माझ्याशी लग्न कर असे अख्तरचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देदहशत निर्माण करण्याचा प्रयत्न : रिव्हॉल्वरसह आरोपी अटक

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : विवाहित प्रेयसीच्या घरासमोर गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न प्रियकराने केला. त्याला शहर पोलिसांनी चार बुलेट व रिव्हॉल्वरसह अटक केली. ही घटना सोमवारी रात्री १२ वाजता शिवाजी वार्डातील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली.शेख अख्तर उर्फ समीर शेख मुख्तार (३०) रा. अकरतनगर (रामरहीमनगर) पुसद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक मोठे गुन्हे नोंद आहे.शिवाजी वार्डातील एका विवाहितेसोबत शेख अख्तरचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. अख्तर हासुद्धा विवाहित असून त्याला दोन अपत्य आहे. प्रेयसी माहेरी आली असल्याचे समजताच शेख अख्तरने सोमवारी रात्री तिच्या घरासमोर जाऊन रिव्हॉल्वरमधून जमिनीवर एक राऊंड फायर केला. पतीसोबत फारकत घेऊन माझ्याशी लग्न कर असे अख्तरचे म्हणणे आहे. यासाठी त्याने फायर करून प्रेयसीच्या मनात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत रात्रभर संपूर्ण शहर अनभिज्ञ होते. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा एक तरुण हातात रिव्हॉल्वर घेऊन शिवाजी वार्डात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार प्रमेश आत्राम, सहायक पोलीस निरीक्षक रत्नपारखी व इंगोले, जमादार दीपक ताठे तसेच डीबी पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र आरोपी पसार झाला. दुपारी ४ वाजता शेख अख्तरला उमरखेड मार्गावरील हत्ती पुलावर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यावेळी शेख अख्तरने पोलिसांवरच रिव्हॉल्वर ताणल्याची माहिती आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी शेख अख्तरविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.दोन आधार कार्ड, दोन जन्मतारखाशेख अख्तर शेख मुख्तार हा कुख्यात गुंड असून त्यावर अनेक गुन्हे नोंद आहे. त्याच्याकडे दोन आधार कार्ड असून एका कार्डवर शेख समीर कुरेशी तर दुसऱ्या कार्डवर शेख अख्तर शेख मुख्तार असे नाव आहे. दोन्हीवर वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. त्याने रिव्हॉल्वर कोठून आणली याचा शोध पोलीस घेत असल्याचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी सांगितले.

टॅग्स :Shootingगोळीबार