शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत तीन हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि  नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तीन हजार हेक्टरचे नुकसान केले आहे. पुरात दोनजण वाहून गेले, तर अनेक घरांत पाणी शिरल्याने अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.  जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, नुकसानीची नोंद करण्यासाठी ७२ तासांचा कालावधी विमा कंपनीने दिला आहे. त्यासाठी लोकेशनसह नुकसानीचे क्षेत्र दाखवावे लागते. याबाबतची माहिती कंपनीला देण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क केला. मात्र, हा फोन रिसिव्हच होत नव्हता. तक्रारी ऑनलाईन नोंद करताना सर्व्हरही डाऊन असल्याचे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि  नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे. या पावसात विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला असून, चार जनावरेही वाहून गेली.  अनेक सखल भागात पुराचे पाणी साचले. यातून उत्पन्नाला मोठा  फटका बसणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक  पाऊस आल्याने शेतात दलदल निर्माण झाली आहे.

किडींचा प्रादूर्भाव- ढगाळी वातावरणासह बदलत्या हवामानाने किडीला पोषक असे वातावरण मिळत आहे. यामुळे पिकांवरील किडी जोर काढण्याची शक्यता आहे. यामुळे उघाड पडताच शेतकऱ्यांना किडींपासून संरक्षण मिळावे म्हणून उपाययोजना कराव्या लागणार आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती