शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये बुडाला ४४ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

जिल्ह्यातून दारू निर्मिती कारखान्यापासून मिळणारे महसुली उत्पन्न्न ५२ कोटी ९२ लाख इतके अपेक्षित आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा महसूल वसूल झाला. १८ मार्चपासून मंगरुळ येथील देशी दारू कारखान्याचे उत्पादन बंद करण्यात आले. यामुळे आतापर्यंत जवळपास सहा कोटींचा महसूल बुडाला आहे. तर दारू दुकाने बंद असल्याने ४५ दिवसात होणारी सरासरी विक्री थांबली. यामुळे ३८ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला.

ठळक मुद्दे४५ दिवसांचा कालावधी : दारूनिर्मिती थांबल्याने सहा कोटींचे नुकसान

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूची निर्मिती, विक्री नैतिकदृष्ट्या वाईटच आहे. मात्र दुसरी बाजू या दारूच्या निर्मिती व विक्रीतून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळतो. त्याच आधारावर इतरही सोईसुविधा पुरविल्या जातात. दारू दुकाने बंदच्या काळात तब्बल ४४ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात दारू निर्मितीतून मिळणाऱ्या सहा कोटी महसुलाचाही समावेश आहे.जिल्ह्यातून दारू निर्मिती कारखान्यापासून मिळणारे महसुली उत्पन्न्न ५२ कोटी ९२ लाख इतके अपेक्षित आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा महसूल वसूल झाला. १८ मार्चपासून मंगरुळ येथील देशी दारू कारखान्याचे उत्पादन बंद करण्यात आले. यामुळे आतापर्यंत जवळपास सहा कोटींचा महसूल बुडाला आहे. तर दारू दुकाने बंद असल्याने ४५ दिवसात होणारी सरासरी विक्री थांबली. यामुळे ३८ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला. शासनाला एकट्या यवतमाळ जिल्ह्यातून ४५ दिवसाच्या कालावधीत बंदमुळे ४४ कोटी २५ लाखाच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.कोरोना विषाणू संसर्गाची महामारी आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी व विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. त्यामुळेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.दारूच्या निर्मिती व विक्रीतून राज्याच्या कोषात घसघशीत रक्कम जमा होते. याचा हिशेबही सर्वश्रृत आहे. आता सरकार आर्थिक अडचणीत असल्याने थेट केंद्रातूनच दारू दुकाने सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले.यवतमाळ शहर वगळता जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २३ विदेशी दारूची दुकाने, १२४ देशी दारूचे दुकाने व ६२ बीअर शॉपी आहेत. ही सर्व दुकाने ५ मेपासून सुरू करण्याचे आदेश होते. हा आदेश रद्द करून आता ही सर्व दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवली जाणार आहे.तळीरामांचा आनंद ठरला औटघटकेचायवतमाळ शहरातील ११ विदेशी दारू दुकाने, १९ बीअर शॉपी, ११ देशी दारू दुकाने बंद राहणार आहे. ग्रामीण भागातील दारू दुकाने सुरु झाल्यानंतर यवतमाळ शहरातील तळीरामांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला होता. वणी येथे विदेशी दारूचे एक दुकान व देशी दारूचे दोन दुकाने बुधवारी सकाळी ८ वाजता उघडण्यात आली होती. येथील गर्दी पाहून आतापर्यंत तळीरामांचा जीव किती कासावीस झाला हे दिसून येते. मात्र वणीतील गर्दी पाहून प्रशासनाने दारू दुकान सुरू ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला. शिवाय कोरोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामीण भागात दारू विक्रीची दिलेली सूट रद्द केली. पुढील आदेशापर्यंत जिल्ह््यात सर्वच ठिकाणी मद्य विक्रीला बंदी आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाcorona virusकोरोना वायरस बातम्या