शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

क्रीडा कार्यालयाचा शिबिरांना खो

By admin | Updated: May 1, 2016 02:27 IST

शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकसित करण्यासाठी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने दरवर्षी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

अनास्था : उन्हाळी शिबिराच्या निधीचा कागदोपत्री विनियोगनीलेश भगत यवतमाळशालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकसित करण्यासाठी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने दरवर्षी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा या कार्यालयाला उन्हाळी शिबिर आयोजनाचा चक्क विसर पडल्याचे दिसत आहे. उन्हाळा संपत आला तरी अद्याप कोणत्याही क्रीडा प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला नाही.उन्हाळ्याच्या सुट्यांचा सदुपयोग व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, मैदानी खेळातून आरोग्य सुदृढ व्हावे, हा या मागचा उद्देश असतो. दरवर्षी उन्हाळ्यात येथील नेहरू स्टेडियमवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय विविध खेळांचे शिबिर घेत असते. यात फूटबॉल, बास्केट बॉल, हॅन्डबॉल, स्केटींग, तायक्वाँदो, कराटे आदी क्रीडा प्रकारांचा यात समावेश असतो. परंतु यंदा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अनास्थेने या शिबिराला सुरुवात झाली नाही. उलट याच नेहरू स्टेडियममध्ये खासगी संघटना विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिर राबवित आहे. त्याला खेळाडूंची मोठी गर्दीही असते. या खासगी शिबिरासाठी पालकांना मोठी रक्कम मोजावी लागते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने शिबिर आयोजित केल्यास अत्यल्प दरात विविध खेळांचे प्रशिक्षण मिळू शकते. यंदा अनेक विद्यार्थी क्रीडा मार्गदर्शनापासून वंचित राहात आहेत. विशेष म्हणजे या शिबिरांसाठी शासनाच्यावतीने निधीही दिला जातो. परंतु येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील काही मंडळी हा निधी हडपण्यासाठी केवळ कागदोपत्री शिबिर आयोजित करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यातच गेल्या ३२ महिन्यांपासून यवतमाळला पूर्णवेळ जिल्हा क्रीडा अधिकारी नाही. त्यातूनच क्रीडा प्रशिक्षणाला बुट्टी दिल्याची बाब पुढे आली आहे.