शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:19 IST

महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली.

ठळक मुद्देसंपाचा फायदा : दुप्पट प्रवास भाडे आकारणी, वणी आगाराला तीन लाखांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली. वणी आगारातून एकही बस सोडण्यात न आल्याने एकीकडे प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत, तर दुसरीकडे प्रवाशांची गरज हेरून खासगी प्रवासी वाहतुकदारांनी त्यांची चांगलीच लूट केली. कुणी दुप्पट, कुणी तिप्पट तर कुणी चौपट भाडे आकारून प्रवाशांचे खिसे रिकामे केले. या संपामुळे वणी आगाराला मंगळवारी सुमारे तीन लाखांचा फटका बसला.वणी आगारात २८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकी २५० कर्मचारी संपात उतरले आहेत. परिणामी मंगळवारी सकाळपासून वणी आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. मंगळवारपासून हे कर्मचारी संपावर उतरणार आहेत, याची कल्पना नसलेले शेकडो प्रवासी सकाळी वणी बसस्थानक परिसरात आलेत. मात्र एसटी कर्मचारी संपात उतरल्याची माहिती मिळाल्याने या प्रवाशांनी खासगी वाहनांचा प्रवासासाठी आधार घेतला. शाळांना सुट्या असल्याने व दिवाळीच्या सणाला प्रारंभ झाल्याने वणी बसस्थानकावर दररोज प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र मंगळवारी संपामुळे या प्रवाशांची चांगलीच गोची झाली. वणी-वरोरा या मार्गाचे प्रवास भाडे २५ रुपये आहे. मात्र प्रवाशांची गरज हेरून अनेक आॅटो चालकांनी वणी-वरोरा मार्गासाठी ५० रुपये घेतले. घोन्सा ते झरी या १८ किलोमिटर अंतराचे एसटी भाडे २३ रुपये आहे. मात्र आॅटो चालकांनी प्रत्येकी १०० रुपये प्रवाशांकडून वसुल केले. यामुळे खासगी वाहतूकदारांची दिवाळीच साजरी झाली.संपात उतरलेल्या येथील कर्मचाºयांनी सकाळी घोषणाबाजी करीत निदर्शने केली. त्यानंतर दिवसभर आगार परिसरात भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळपर्यंत हा संप सुरूच होता. मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा फिस्कटल्याने मागणीच्या पूर्ततेसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. होत असलेला त्रास लक्षात घेता सदर संप मिटावा, अशी जनभावना आहे.अन् त्या बसला परत पाठविलेसंप सुरू असताना मंगळवारी सकाळी यवतमाळ येथून महामंडळाची एक बस वणी येथे पोहचताच, संतप्त संपकरी कामगारांनी सदर बस अडवून चालकाची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर ही बस वणीच्या आगारात लावण्यात आली. वातावरण शांत झाल्यानंतर बस यवतमाळ येथे परत पाठविण्यात आली.वणी आगारात एकूण २८१ कर्मचारी असून त्यांपैकी २५० लोक संपात उतरले आहे. परिणामी वणी आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. मंगळवारचा हा संप शंभर टक्के यशस्वी झाला.-अभिजीत कोरटकर,आगार व्यवस्थापक वणी