शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आर्द्रतेच्या नावाखाली कापूस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:20 IST

शेतकºयांना कापसात जादा आर्द्रता असल्याची बतावणी करून व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकरी लूटले जात असून यंत्रणा मात्र सुस्तच आहे.

ठळक मुद्देकेवळ ३८०० रूपये दर : प्रशासनासह राजकीय नेत्यांचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शेतकºयांना कापसात जादा आर्द्रता असल्याची बतावणी करून व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकरी लूटले जात असून यंत्रणा मात्र सुस्तच आहे.तालुक््यात कापूस खरेदीची मोठी व्यापारपेठ म्हणून फुलसावंगी कडे बघितले जाते. काळी दौ., हिवरा, आणि गुंज येथील खासगी कापूस खरेदीला ११ आॅक्टोबरपासून सुरूवात झाली. या सर्व ठिकाणी व्यापाºयांनी शेतकºयांना लुटण्याचा बेत आखलेला दिसत आहे. गुंज येथे मुहूर्ताला ४१00 रूपयांचा दर देण्यात आला. मात्र जेमतेम पाच, दहा क्विंटलची खरेदी होताच व्यापाºयांनी दर पाडले.सोमवारी तालुक्यात बहुतांश बाजारात कापसाच्या गाड्या उभ्या होत्या. गुंज येथे पुसद तालुक्यातील बोरी येथून आलेला शेतकरी कापूस विकताना अक्षरश: ढसाढसा रडला. कापसावर प्रचंड खर्च केला. परंतु भाव मात्र ३८०० रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच प्रति क्विंटल ११ किलोची ‘कट्टी’ घेतली जात असल्याचेही सांगितले. याशिवाय हमाली आणि तोलाईचा खर्चही शेतकºयाला करावा लागतो. हा खर्च शेतकºयांच्या चुकाºयातून परस्परच कापला जातो.शेतकºयांना भाव ३८०० रूपये सांगितला जात असला, तरी सर्व कपात वगळून प्रत्यक्षात त्यांच्या हाती प्रती क्विंटल ३२०० रूपयेच पडतात. मात्र शेतकºयांची लूट सुरू असताना तालुक्यात शासकीय दराने कापूस खरेदी करण्याची मागणी कोणत्याही राजकीय नेत्यांनी केली नाही, हे विशेष.फुलसावंगीचे कापूस मार्केट १०० कोटींचेतालुक्यातील फुलसावंगी येथे दरवर्षी जवळपास १00 कोटींची कापूस खरेदी केली जाते. या खरेदीच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीला नाममात्र सेस भरला जातो. ही कोट्यवधींची उलाढाला कुणाच्याच लक्षात येत नाही. कापसाचा सेस म्हणून पावतीच फाडली जात नाही. अन्य पिकांची नोंद घेऊन सेसची पावती दिली जाते. या पहिल्या पायरीपासूनच शेतकºयांची लूट सुरू होते. यात संबंधित यंत्रणा आणि व्यापाºयांचे संगनमत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तरीही कुणीच कारवाई करीत नसल्याने शेतकºयांची लूट सुरूच आहे.