शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फुलसावंगीत घडले सामाजिक सौहार्दाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:55 IST

सर्वधर्म समभाव आणि धार्मिक एकात्मतेसाठी प्रसिद्ध महागाव तालुक्यातील फुलसावंगीत बकरी ईद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडले.

ठळक मुद्देसर्वधर्मीय सहभाग : बकरी ईद आणि गणेश विसर्जन उत्साहात

विवेक पांढरे ।लोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : सर्वधर्म समभाव आणि धार्मिक एकात्मतेसाठी प्रसिद्ध महागाव तालुक्यातील फुलसावंगीत बकरी ईद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडले. बकरी ईदला गणेश मंडळांनी साऊंड सिस्टीम पाच तास बंद ठेवून मुस्लीम बांधवांचे स्वागत केले, तर गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांचा मुस्लीम बांधवांनी सत्कार केला.महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली फुलसावंगी या ना त्या कारणांनी चर्चेत असते. परंतु गावातील सर्वधर्म समभावाला तडा गेला नाही. सर्वधर्मीय नागरिक शांततेने आणि गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांच्या सुख-दु:खात धावून येतात. गत आठवड्यात पार पडलेल्या बकरी ईदच्या पर्वावर एकात्मतेचे दर्शन घडले. ईदची नमाज अदा होईपर्यंत सर्व गणेश मंडळांनी राऊंड सिस्टीम तब्बल पाच तास बंद ठेवले. तसेच नमाज अदा करून येणाºया मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.याच एकात्मतेला आणखी बळकटी मिळाली ती विसर्जनाच्या मिरवणुकीत. फुलसावंगीतील मुस्लीम बांधवांनी स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब नाईक चौकात मंडप उभारला. सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा गावातील मुस्लीम समाजाच्यावतीने सत्कार केला. सर्वधर्मीय बंधुत्वामुळे फुलसावंगीत एकात्मतेची झालर लागली. भविष्यात फुलसावंगी गावासाठी आणि दोन्ही समाजांच्या तरुण पिढीसाठी ही पायाभरणीच ठरली.या प्रसंगी विजयराव महाजन, उपसरपंच अमर दळवे, नासीरखाँ बशीरखाँ, समशेरखाँ, बाबूखाँ, पोलीस पाटील राजेश नाईक, इकबालभाई, शम्मी खान, बंटी पठाण, याकूब लाला, हमीदभाई, सै.नासीर, इबाद खान, आरिफ लाला, गणपत बोंढारकर, महागावचे ठाणेदार करीम बेग मिर्झा, एपीआय कैलास भगत, गुणवंत गोटे, जमादार माणिक पवार, नायब तहसीलदार जी.एन. कदम, मंडळ अधिकारी आर.डब्ल्यू. पुरी, तलाठी जी.एच. कलाने यांच्यासह गावकरी उपस्थित होते.डीजे सिस्टीमला बगलशांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांनी डीजे वाजवून नये व शांततेत गणेश विसर्जन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत येथील आठ गणेश मंडळांनी डीजे साऊंड सिस्टीमला बगल दिली. ढोलताशांच्या गजरात गणेशाचे विसर्जन केले. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी सर्व गणेश मंडळांचे स्वागत केले.