शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; प्रचारात उतरलेय येडे आणि धोटे कुटुंबीय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:26 IST

लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवार श्रीमंत तर काही अतिशय गरीब आहे. त्यामुळे वैशाली येडे यांच्या कुटुंबासह नातेवाईक असलेले धोटे कुटुंबीय प्रचारासाठी झटत आहे.

ठळक मुद्देराजकीय आखाडा : जिंकण्यासाठी सारेच करताहेत मेहनत

कुटुंब रंगलंय राजकारणातलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवार श्रीमंत तर काही अतिशय गरीब आहे. त्यामुळे वैशाली येडे यांच्या कुटुंबासह नातेवाईक असलेले धोटे कुटुंबीय प्रचारासाठी झटत आहे.प्रहार जनशक्ती संघटनेच्या उमेदवार वैशाली येडे यांची उमेदवारी सुरूवातीपासून चर्चेत आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी रक्तदान करून अर्ज दाखल केला. प्रचाराचा नारळ फोडताना देशी दारूच्या दुकानापुढे दुध वाटून प्रचार सुरू करण्यात आला. गावोगावी प्रचार करताना त्यांची नातेवाईक मंडळी आणि ग्रामस्थ गावोगावी फिरत आहेत. यामध्ये आई-वडील, सासू-सासरे, दीर-भावजया, चुलते यांचा समावेश आहे.वैशाली येडे। प्रहारवैशाली येडे या प्रहार जनशक्ती संघटनेकडून लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. या स्थितीत त्यांच्या प्रचारकार्यात सासर आणि माहेरची मंडळी मदतीसाठी काम करीत आहे.वडील । माणिकराव रामराव धोटेवैशाली येडे यांचे पती वारले आहे. कुटुंबाची जबाबदारी त्या स्वत: पार पाडत आहे. राजकारणापासून हे संपूर्ण कुटुंब कोसो दूर आहे. वैशाली यांचे वडील माणिकरावांना राजकारणाचा गंध नाही. मात्र मुलगी रिंगणात असल्याने पती-पत्नी दोघेही घरोघरी जाऊन प्रचाराचे काम करीत आहे.नातेवाईकांची फळीचसासरे, सासू, भासरे, जावा, गावातील मंडळी, सख्खे-चुलत असे सारे नातेवाईक आपल्या गावात वैशालीताईचा प्रचार करीत आहे. वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी सर्व नातेवाईकांचीच कार्यकर्ते म्हणून फळी तयार झाली आहे.शिट्टी वाजवून अनोखा प्रचारवैशाली येडे यांचा अनोखा प्रचार सुरू आहे. त्यांच्याकडे वाहन नसले तरी शिट्ट्या आहेत. गावामध्ये शिट्ट्या वाजवून लोकांना गोळा करण्याचे काम करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या जात आहे.झोळी पसरवून मदतनिवडणुकीसाठी लागणारा पैसा या उमेदवाराकडे नाही. यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रचार करताना झोळी पसरून मदत गोळा करण्याचे काम कार्यकर्ते करीत आहे. यामुळे हा अनोखा उमेदवार गावात चर्चेचा विषय झाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019