शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; सट्टा बाजारात शिवसेनेला सर्वात कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:35 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट आणि टफ लढत झाली. बहुतांश ठिकाणी फिप्टी-फिप्टी चालल्याने नेमका कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांनाही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा : शिवसेना ७० पैसे, काँग्रेस १ रुपया ४० पैसे, गुप्तचरांचा अहवाल मात्र काँग्रेसला पोषक

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट आणि टफ लढत झाली. बहुतांश ठिकाणी फिप्टी-फिप्टी चालल्याने नेमका कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांनाही कठीण झाले आहे. गुप्तचर यंत्रणा काँग्रेसच्या विजयाचे संकेत देत असताना सट्टा बाजार मात्र सर्वात कमी दर सांगून शिवसेनेकडे आपला कल दाखवित आहे. त्यामुळे एकूणच संभ्रमाची स्थिती असून खरे चित्र २३ मे नंतरच स्पष्ट होणार आहे.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यात थेट लढत झाली. मात्र वंचित बहुजन आघाडी, भाजप बंडखोर, प्रहार, बसपा हे उमेदवारही मतविभाजनाच्या दृष्टीने दखलपात्र ठरले. मतदारांच्या कलानुसार उमेदवारांची हवा सातत्याने बदलत असल्याचे चित्र पहायला मिळाले. मतदारांमध्ये मोदी हवे व मोदी नको असे थेट दोन गट पडले. मोदी हवे म्हणणारे एकजूट आहेत, तर मोदी नको म्हणणारे विविध उमेदवारांमध्ये विखुरले गेले आहे. मतदानाची टक्केवारी, प्रत्येक पंचक्रोषित बदलती हवा यामुळे नेमका कोण निवडून येणार हे सांगणे कठीण आहे. तर्क व अंदाज यावरच उमेदवारांच्या संभाव्य विजयाचे इमले बांधले जात आहे. सर्वत्र संभ्रमाची स्थिती आहे. अमूक उमेदवार निवडून येईल, असे कुणीही छातीठोकपणे सांगण्यास तयार नाही. काँग्रेस व शिवसेनेची मंडळीसुद्धा तेवढी ‘कॉन्फीडन्ट’ दिसत नाही. त्यामुळे कुणी काँग्रेस तर कुणी शिवसेना सांगते आहे. या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर शासनाची गुप्तचर यंत्रणा व सट्टा बाजारातील कल तपासले असता तेथूनही संभ्रमाचेच संकेत मिळाले आहे.सट्टा बाजारातील दरांवर बरेच अंदाज बांधले जातात. ‘ज्याचा भाव कमी त्याच्या विजयाची शक्यता अधिक’ असे सट्टा बाजाराचे समीकरण आहे. मतदानापूर्वीपासून सट्टा बाजारात काँग्रेस व शिवसेनेच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे. मात्र गुरुवारच्या मतदानानंतर हे भाव स्थिर झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सूत्रानुसार, सट्टा बाजारात शिवसेनेला सर्वात कमी ६५ ते ७० पैसे भाव आहेत. काँग्रेसला हा भाव १ रुपया ३५ पैसे ते १ रुपया ४० पैसे असा आहे. मतदानापूर्वी भाजप बंडखोराचा दर १७ रुपये होता. मतदानानंतर मात्र हा दर उघडलाच गेला नाही.सट्टा बाजारातील दर व अंदाजानुसार शिवसेनेला पोषक स्थिती असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शासनाच्या गुप्तचर यंत्रणेचे कल नेमके या उलट आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेस गड सर करेल परंतु मतांची आघाडी मोठी राहणार नाही, असा गुप्तचरांचा अंदाज असल्याची माहिती आहे.माणिकरावांची दिल्लीत एन्ट्री की भावनाताईचा विक्रम ?माणिकराव ठाकरे खासदार म्हणून पहिल्यांदा दिल्लीत एन्ट्री करतात की भावनाताई गवळी पाचव्यांदा निवडून येण्याचा विक्रम नोंदवितात, हे स्पष्ट होण्यासाठी नागरिकांना आणखी दीड महिना अर्थात २३ मे रोजीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत राजकीय गोटात व चौकाचौकात तर्क, अंदाज, शक्यता वर्तवून चर्चांचा फड तेवढा रंगणार एवढे निश्चित.तर गुप्तचरांवर होते कारवाईनिवडणूकीचे अंदाज खोटे ठरल्यास कारणे दाखवा नोटीस, बदली या सारखी कारवाई होत असल्याने संपूर्ण मतदारसंघात फिरुन, विविध कौशल्य वापरुन व आपला अनुभव पणाला लावून गुप्तचर यंत्रणा शक्यतोवर तंतोतंत किंवा जवळपास तरी अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न करते. गुप्तचरांच्या या अंदाजावर विश्वास दाखविल्यास काँग्रेसचे संकेत मिळत आहेत. सट्टा बाजार व गुप्तचरांच्या अंदाजानंतरही संभ्रमाची स्थिती मात्र कायम आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019